शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

लोहारा गावाजवळ अपघातात दोन ठार

By admin | Updated: January 21, 2017 00:07 IST

अज्ञात वाहनाची धडक : शहादा तालुक्यातील घटना

नंदुरबार/शहादा : शेतात विहीर बांधकाम करून मोलमजुरी करणा:या मजुरांच्या दुचाकीला शहादा तालुक्यातील लोहारा गावाजवळ चारचाकी वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत दोन जण ठार झाल्याची घटना घडली़ गुरुवारी सायंकाळी झालेल्या या घटनेनंतर शुक्रवारी दुपारी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े लोहारा येथील रहिवासी किरण भीमराव बागुल (25) हा राजस्थानातून आलेल्या अमरचंद चांभार (50) व नारायण बन्सी भिल (30) यांच्यासह शहादा परिसरात विहीर बांधकामाचा व्यवसाय करत होता़ बुधवारी किरण बागुल याच्यासोबत अमरचंद व नारायण हे दोघेही लोहारा परिसरात विहिरीची पाहणी करण्यासाठी जात असताना, सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अज्ञात चारचाकी वाहनाने किरण चालवत असलेल्या दुचाकी क्रमांक एमएच 39 क्यू 3394 ला कट मारला, यात ही दुचाकी वाहनात अडकल्याने दोघे दुचाकीसोबत वाहनाखाली आले तर एक जण दूर फेकला गेला़ यात जबर मार बसल्याने किरण बागुल व अमरचंद चांभार हे जागीच ठार झाल़े तर नारायण भिल हा गंभीर जखमी झाला़ शहादा ते लोहारा दरम्यान लोहारा फाटय़ावर झालेल्या या घटनेनंतर अज्ञात चारचाकी वाहन घटनास्थळावरून फरार झाल़े दुखापतग्रस्त नारायण भिल याच्यावर शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आह़े याबाबत विठ्ठल हिरालाल माळी यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चारचाकी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक नीलिमा सातव करत आहेत़ जखमीवर उपचारबुधवारी सायंकाळी साडेसात वाजता घडलेल्या या घटनेवेळी या परिसरातून जाणा:या शेतमजूर आणि शेतक:यांच्या लक्षात ही घटना आली़ दुचाकीस्वारांना गंभीर जखमा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता़ तर जखमी नारायण भिल यास परिसरातील ग्रामस्थांनी रुग्णालयात दाखल करून पोलिसांना माहिती कळवली़ मयत किरण बागुल हा युवक लोहारा येथील रहिवासी असल्याची माहिती देण्यात आली आह़े