शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात दोन गटात हाणामारी, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :मागील भानगडीच्या वादातून शहरातील कसाई मोहल्ला भागात दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात दोनजण जखमी झाले आहेत. परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.कसाई मोहल्ला भागातील शेख मुस्तकिन शेख शब्बार व अश्पाक अब्दुल यांच्यात जुन्या भानगडीचा वाद होता. त्या वादाचे पर्यावसान पुन्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :मागील भानगडीच्या वादातून शहरातील कसाई मोहल्ला भागात दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात दोनजण जखमी झाले आहेत. परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.कसाई मोहल्ला भागातील शेख मुस्तकिन शेख शब्बार व अश्पाक अब्दुल यांच्यात जुन्या भानगडीचा वाद होता. त्या वादाचे पर्यावसान पुन्हा मारहाणीत झाले. अश्पाक अब्दुल व यांनी चौघांच्या मदतीने शेख मुस्तकिन शेख शब्बार यांच्या घरात घुसून लाकडी दांडका आणि हाताबुक्यांनी इब्राहिम अली कुरेशी यांना बेदम मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. शेख मुस्तकिन शेख शब्बार यांच्या फिर्यादीवरून अश्पाक अब्दुल, रिजवान कमर बेग, बाशीर ईस्माईल व कासम सर्व रा.कसाई मोहल्ला यांना अटक करण्यात आली आहे. दुसरी फिर्याद नाजीम अलताफ शेख कुरेशी यांनी दिली. मागील भानगडीच्या वादातूनच फारूक पहेलवान, रिसशेख शफी, आमीन पारू कुरेशी, बबल्या पारू कुरेशी यांनी घरात घुसून आबीद यास लाकडी दांडका आणि हाताबुक्यांनी जबर मारहाण केली. शिविगाळ करून ठार मारण्याची देखील धमकी दिली. याबाबत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही गटाच्या चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यात फारूक पहेलवान, आमीन पारू कुरेशी, अश्पाक अब्दुल व रिजवान कमर बेग यांचा समावेश आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.