शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेला पळवून नेल्याच्या संशयावरून दोन गटात मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 12:51 IST

उजळोद येथील घटना : आठ जण जखमी, 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मंदाणे :  शहादा तालुक्यातील उजळोद गावातील विवाहितेला दोघा मुलांसह पळवून नेल्याप्रकरणी विचारपूस करण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी होऊन आठ जण जखमी झाल्याची घटना घडली. दोन्ही गटातर्फे याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे.पोलीस सूत्रानुसार, शहादा तालुक्यातील उजळोद गावातील हिरालाल बाजीराव पाटील याने गावातीलच विवाहितेला दोन मुलांसह पळवून नेल्याच्या संशयावरून त्यास याबाबत विवाहिता व मुले कुठे आहेत अशी विचारणा प्रकाश वसंत पाटील यांनी केली. याचा राग येऊन आरोपी हिरालाल बाजीराव पाटील, गोकूळ वामन पाटील, हिरामण वामन पाटील, राकेश सज्रेराव पाटील, हिंमत मधुकर पाटील, सज्रेराव बाबूराव पाटील, शिवदास पाटील, अमोल पाटील, योगेश पाटील, मीना राकेश पाटील, सुनीता हिंमत पाटील, नर्मदा वामन पाटील, मीना बाजीराव पाटील, विमलबाई गोकूळ पाटील (सर्व रा.उजळोद) यांनी फिर्यादी प्रकाश पाटील व त्यांच्या गटातील लोकांना हिरालाल पाटील यांनी आपल्या घरातून सर्वानी लाकडी काठय़ा, दांडक्यांनी मारहाण करून दुखापत केली. ही घटना 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात प्रकाश पाटील यांनी फिर्याद दिल्याने 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले. या गुन्ह्याचा तपास फौजदार ज्ञानेश्वर बडगुजर करीत आहेत. याच घटनेत मीना राकेश बोरसे यांनीही शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीत आरोपी वसंत भीमराव पाटील याने माझा चुलत दीर हिरालाल पाटील यास तू माङया मुलीला का भेटतो, प्रेमसंबंध का ठेवतो यावरून वसंत भीमराव पाटील, कैलास भीमराव पाटील, तुकाराम भीमराव पाटील, सोनू वसंत पाटील, संतोष विश्वास पाटील, नितीन विश्वास पाटील, सोन्या तुकाराम पाटील, बबलू रवींद्र पाटील, लोटन दिलीप पाटील, दिलीप युवराज पाटील, किशोर विश्वास पाटील, बापू भावराव पाटील, रवींद्र युवराज पाटील, गोपाल संभाजी पाटील, बापू देवीदास पाटील, छोटू भीमराव पाटील, राहुल छोटू पाटील, आकाश छोटू पाटील यांनी एकत्र गर्दी करून लोखंडी सळई, गज, लाठय़ा-काठय़ांनी मारहाण करून पाच जणांना जखमी केले. याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक बापू शिंदे हे करीत आहे. या हाणामारीच्या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता आहे.