शहरातील महादेव नगरात राहणारे मनोहर सतिलाल बागुल यांचा वाहन भाडोत्री पद्धतीने देण्याचा व्यवसाय आहे. १८ सप्टेंबर रोजी त्यांच्याकडे दोघे अनोळखी आले होते. आपण फायनान्स कंपनीतून आलो असून दीपक व सतीश अशी नावे दोघांनी सांगितली होती. दोघांनी मनोहर बागुल यांच्या वाहनाची चाैकशी करून वाहन भाडोत्री पद्धतीने पाहिजे असल्याचे सांगितले. परंतु आधी वाहनाची ट्रायल घेण्याचा बहाणा त्यांनी केला. बागुल यांनीही गाडी दिली. दोघांनीही १० मिनिटात येतो असे सांगून गाडी नेल्यानंतर, ते परत आलेच नाहीत. वाहनमालक बागुल यांनी तपासणी केली असता, दोघांची ओळख पटत नसल्याने अखेर त्यांनी पोलिसात धाव घेतली. याबाबत मनोहर बागुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक व सतीश नामक दोघा संशयितांविरोधात शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार करत आहेत.
फायनान्सच्या नावाने ट्रायल घेण्याचे सांगून वाहन घेऊन दोघे पळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:33 IST