नंदुरबार : शहरातील निझर रस्त्यावरील एस.एस.लॉजींगमध्ये अश्लिल चाळे करणाऱ्या दोन मुले व दोन मुलींना उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. समज देवून त्यांना पालकांच्या स्वाधिन करण्यात आले. याप्रकरणी लॉज मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पूर्वीच्या हॉटेल मंदाकिनीमध्ये एस.एस.लॉजींग सुरू करण्यात आली आहे. सुरज सुधाकर मराठे यांनी ते चालविण्यास घेतले आहे. या ठिकाणी कॉलेजमधील तरुण, तरुणींना प्रवेश दिला जावून तेथे अश्लिल चाळे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी १० वाजता पोलीस निरिक्षक भापकर, सहायक निरिक्षक पगार व महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी लॉजींगवर धाड टाकली. तेथे दोन तरुणी व दोन तरुण अश्लिल चाळे करतांना आढळून आले. त्यांना पथकाने ताब्यात घेवून उपनगर पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्या पालकांना बोलावून समज देवून त्यांना सोडण्यात आले.हवालदार रवींद्र शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून हॉटेल मालक सुरज सुधाकर मराठे यांच्याविरुद्ध ३६/१३४ प्रमाणे कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. या लॉजींगच्या परिसरात रहिवास वस्ती असून यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.येथील अवैध बाबींविषयी यापूर्वी देखील तक्रारी देण्यात आलेल्या आहेत.दरम्यान, सर्व लॉज व हॉटेल मालकांना यापूर्वीच नोटीसा दिल्या आहेत. शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावून ते कार्यान्वीत ठेवण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. असे असतांना अनेक लॉज मालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे असे प्रकार वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.
एसएस लॉजींगमध्ये अश्लिल चाळे करणारे दोन जोडपे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 11:46 IST