शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवापूरात बनावट दस्तऐवजाद्वारे 29 लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 12:45 IST

लिपीकाचा प्रताप : नवापूर उपकोषागार व स्टेट बँकेतील प्रकार

नंदुरबार : नवापूर उपकोषागार कार्यालयाच्या नावाने खोटय़ा दस्ताऐवजाच्या आधारे कोषागार कार्यालयातील लिपीकाने स्टेट बँकेच्या नवापूर शाखेतून 29 लाख रुपयांचे देयके परस्पर काढून घेतल्याची घटना नवापूरात घडली. याबाबत अपर कोषागार अधिकारी यांनी फिर्याद दिल्याने लिपीक इंदल जाधव व बँकेतील संबधीत अधिका:यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनुसार, नवापूर उपकोषागार कार्यालयात कार्यरत कनिष्ठ लिपीक इंदल महारू जाधव यांनी 8 ते 12 जून दरम्यान या दरम्यान खोटे दस्ताऐवज तयार केले. नवापूर तहसीलदार यांच्याकडून कोणत्याही रक्कमेचे देयक सादर नसतांना उपकोषागारांचा संगणकीय सब ट्रेझरी     नेट या अज्ञावलीमध्ये 29 लाख रुपयांची दोन टोकन ऑनलाईन पारीत केली. मुद्रीत बँक प्रदान  सुचना पत्रातील तहसीलदारांची सही व खाते क्रमांकावर खाडाखोड करून उपकोषागार अधिकारी साळी यांच्या खोटय़ा व बनावट सह्या केल्या. ते सुचनापत्र स्टेट बँकेच्या नवापूर शाखेत सादर      केले. त्याआधारे शासकीय रक्कम इंदल जाधव यांनी त्यांच्या खात्यावर जमा केली. त्यानंतर त्यांनी एटीएम व बँकेतील काऊंटरवरून 25 लाख 80 हजार रुपये काढून घेतले. स्टेट बँक नवापूर शाखेच्या संबधीत अधिकारी व कर्मचा:यांनी बँक प्रदान सुचना पत्रकावर उपकोषागार यांच्या स्वाक्षरीची पडताळणी केली नाही. शिवाय व्हाऊचर नसतांना संबधित अधिकारी व कर्मचा:यांनी खोटय़ा दस्ताऐवजांच्या आधारे 29 लाख रुपये इंदल महारू जाधव यांच्या नावावर जमा केली. ही बाब जिल्हा कोषागार कार्यालयात रक्कमेच्या पडताळणीनंतर समोर  आली.याबाबत अपर कोषागार अधिकारी प्रकाश शिवनाथ वायकर यांनी फिर्याद कनिष्ठ लिपीक इंदल जाधव व स्टेट बँकेच्या नवापूूर शाखेतील संबधीत अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक राजपूत करीत आहे.