शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात ट्रकला अचानक लागलेल्या आगीने घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील लक्ष्मीनगर  परिसरात पहाटे तीन वाजेच्या सुमारास अचानक उभ्या असलेल्या एका ट्रकला आग लागल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील लक्ष्मीनगर  परिसरात पहाटे तीन वाजेच्या सुमारास अचानक उभ्या असलेल्या एका ट्रकला आग लागल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. तात्काळ पालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण केल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत ट्रकचा पुढील भाग जळून खाक झाला आहे.शहरातील लक्ष्मीनगर भागात  राहणा:या शरीफ बागवान यांच्या मालकीचा ट्रक (क्रमांक एम.एच.39 एडी- 0695) उभा होता. शहरात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने ट्रक घरासमोरच एका मोकळ्या जागेत उभा करण्यात आला होता. शुक्रवारी रात्रीही पावसाची रिमङिाम सुरू असताना बागवान कुटुंब व परिसरातील सर्वजण झोपेत असताना मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक आगीच्या ज्वाला भडकताना काही जणांना दिसून आल्या. त्यांनी बाहेर येऊन  पाहिले असता  ट्रक जळताना दिसला. नागरिकांनी तात्काळ  शरीफ बागवान यांना  उठवून  ट्रकला  आग लागल्याचे  सांगितले. ट्रकला  पुढील बाजूने  आगीच्या ज्वालांनी वेढले होते. ट्रकला अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. तात्काळ अग्निशामक दलाच्या जवानांना घटनेची माहिती देण्यात आली. पालिकेचे दोन्ही अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले व त्यांनी पहाटे तीन वाजेच्यास सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोर्पयत ट्रकचा पुढील मुख्य भाग जळून खाक झाला होता. ट्रकला आग  नेमकी  कशामुळे लागली, पावसाची रिमङिाम असतानाही  ट्रक कशामुळे पेटला, कुणी माथेफिरूचे  काम तर नाही ना  असे अनेक प्रश्न  उपस्थित होत आहेत.