लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : निझर रस्त्यावरील पेट्रोल पंपच्या आवारात ट्रक चालकाच्या खिशातून चोरटय़ांनी 16 हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिक येथील ट्रक चालक प्रमोद खंडू पाटील हे 6 रोजी रात्री नंदुरबार-निझर रस्त्यावरील सुदर्शन पेट्रोलपंपच्या परिसरात थांबले होते. रात्री उकाडय़ामुळे त्यांनी पॅण्ट काढून वाहनाच्या केबीनमध्ये टांगून ठेवली होती. रात्री ते झोपेत असतांना चोरटय़ांनी त्यांच्या खिशातील रोख 16 हजार रुपये व महत्त्वाचे दस्ताऐवज चोरून नेले. सकाळी चालक प्रमोद पाटील यांना चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शोधाशोध केली. परंतु उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांनी उपनगर पोलिसात फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार वाघ करीत आहे. दरम्यान, गेल्याच आठवडय़ात वळण रस्त्यावर ट्रक चालकाची लूट करणा:या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आता पुन्हा हा प्रकार घडल्याने पोलिसांनी चोरटय़ांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
पेट्रोलपंपवर ट्रक चालकाचे 16 हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 12:49 IST