कागड्या ईद्या वसावे (५०) असे मयताचे नाव आहे. कागड्या व पत्नी रमाबाई कागड्या वसावे (रा. सिंधीमाळ, ता.अक्कलकुवा) हे गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या राज्यमार्ग ओलांडून दुसऱ्या बाजूला जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या ट्रकने (जीजे १८ एझेड ९२७७) कागड्या ईद्या वसावे यांना धडक दिली. भरधाव ट्रकखाली अक्षरश: चिरडले गेल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला, तर रमाबाई या थोडक्यात बचावल्या. हा ट्रक अहमदाबाद येथून विशाखापट्टणम येथे जात असल्याचे सांगण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नंदराज पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश केदार, पोलीस नाईक अजय पवार, रवि कोराळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. त्याची पत्नी रमाबाई कागड्या वसावे यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली असून, ट्रकचालक गुलाम पठाण (रा.राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.