लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : ऑईल भरुन घेऊन जाणारा ट्रक शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पो व मोटारसायकल उलटल्याने मोठे नुकसान झाले. सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली.याबाबत वृत्त असे की, खेतियाकडे ऑईल भरून जाणारा ट्रक (क्रमांक यू.पी.83 टी-2562) सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास ब्राrाणपुरी येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पो व मोटारसायकलवर उलटला. यात टेम्पो व मोटारसायकलचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाल्याचे समजते. टेम्पो व मोटारसायकल भरपाईची मागणी टेम्पोचे मालक रवींद्र पवार यांनी केली आहे. घटनास्थळी फौजदार शिंदे, हवालदार छोटूलाल पावरा, वाहतूक पोलीस अजय पवार यांनी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली.
टेम्पो व मोटारसायकलवर ट्रक उलटून अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 12:18 IST