शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव...
2
सेल्फी काढायला बोलावलं, गाडीत ओढून चौघांनी मारहाण केली; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण
3
अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा
4
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
5
काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले...
6
Deep Amavasya 2025: आज दिवसभरात १० मिनिटं तरी दीपपूजन कराच; पूर्ण वर्ष प्रकाशमान होईल!
7
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
8
गजकेसरी, गुरुपुष्यामृतयोग एकाच दिवशी: ७ राशींची भरघोस भरभराट, चौफेर लाभच लाभ; शुभ वरदान काळ!
9
Stock Market Today: फ्लॅट ओपनिंगनंतर शेअर बाजार घसरला, Nifty २५,२०० च्या खाली; Tata Motors, Tata Consumer मध्ये तेजी
10
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
11
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
12
अभिमानास्पद! इटालियन तरुणींनी गायली 'वाजले की बारा' लावणी, समोर आलं नागपूरचं कनेक्शन
13
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
14
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
15
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
16
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
17
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
18
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
19
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
20
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत

ट्रकने उडविला पृथ्वी स्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अपघातग्रस्त ट्रक पोलिस ठाण्यात जमा करण्यासाठी आणत असताना अचानक ब्रेक फेल झाल्याने ट्रकने स्टेट ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपघातग्रस्त ट्रक पोलिस ठाण्यात जमा करण्यासाठी आणत असताना अचानक ब्रेक फेल झाल्याने ट्रकने स्टेट बँकेसमोरील लायन्सच्या सुशोभिकरण स्तंभाला धडक दिली. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मोठ्या प्रमाणावर वर्दळ असलेल्या या चौकात सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, अपघातग्रस्त ट्रकची पुर्णत: तपासणी न करताच ती पोलीस ठाण्यात जमा करण्याची घाई का करण्यात आली याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.नवापूर ते कोळदा दरम्यान रस्ता दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे त्या मार्गावरील रेल्वेगेट बंद असल्याने नवापूर-धुळे मार्गावरील वाहतूक ही उच्छल, निझर, नंदुरबारमार्गे वळविण्यात आली आहे. परिणामी या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ राहत आहे. त्यातील अवजड ट्रकचा (क्रमांक टीएन ५२-जे. ८३७६) शुक्रवारी सकाळी चौपाळे शिवारात अपघात झाला होता. अपघातग्रस्त ट्रक सायंकाळी पोलिसांनी तालुका पोलीस ठाण्यात जमा करण्यासाठी आणण्याचे ठरविले आणि हा अपघात झाला.अपघातग्रस्त ट्रक खाजगी चालकाला घेऊन पोलिसांनी शहरातील वर्दळीच्या रस्त्याने आणली. वाघेश्वरी चौफुली ते स्टेट बँक मार्गावर मोठा मारुती मंदीराजळ ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले. सायंकाळची वेळ असल्याने मोठा मारुती ते स्टेट बँक दरम्यान मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. जीवीत हानी टाळण्यासाठी चालकाने कसोशिने प्रयत्न केले.ट्रक गिअरच्या माध्यमातून नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश येत नसल्याचे पाहून चालकाने ट्रक थांबविण्यासाठी थेट स्टेट बँकसमोरील रस्ता दुभाजकात लायन्सने उभारलेल्या पृथ्वीच्या प्रतिकृतीला धडक दिली. त्यात पृथ्वीच्या प्रतिकृतीचा स्तंभ पुर्णत: ट्रकखाली दाबला गेला. त्यामुळे ट्रक थांबण्यास मदत झाली. सुदैवाने यावेळी कुणीही दुचाकी किंवा इतर वाहन त्यावेळी आले नसल्याने मोठा अनर्थ टळला.अपघात भयंकर आणि त्याचा आवाज एवढा मोठा होता की त्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. जर सकाळच्या वेळी ही घटना घडली असती तर जीवीत हानी झाली असती असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.याबाबत रात्री उशीरापर्यंत पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.