शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॉलाची कारला धडक, एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा-प्रकाशा रस्त्यावर लांबोळा ते डामरखेडा दरम्यान १४ चाकी ट्रालाने कारला दिलेल्या धडकेत तळोदा येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहादा-प्रकाशा रस्त्यावर लांबोळा ते डामरखेडा दरम्यान १४ चाकी ट्रालाने कारला दिलेल्या धडकेत तळोदा येथील युवक ठार झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर युवकाला धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.मोहित सुशील सूर्यवंशी असे मयत युवकाचे नाव आहे तर वासुदेव जव्हेरी व सुनील चित्ते हे दोनजण जखमी झाले. अपघात घडल्यानंतर ट्रक चालक ट्रक सोडून फरार झाला आहे. या अपघाताची भीषणता एवढी भयावह होती की अपघातग्रस्त कारच्या पुढील भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाला असून संपूर्ण आॅईल रस्त्यावर सांडले होते.गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शहाद्या कडून तळोद्याकडे जाणारी इंडिका कार (क्रमांक एमएच ०६ डब्ल्यू ६१९५) हिला प्रकाशा कडून येणाऱ्या १४ चाकी ट्रॉलाने (एमएच २० एजी ४१००) यांच्यात समोरासमोर धडक होवून अपघात घडला या अपघातात इंडिका कार चालक मोहित सुशील सूर्यवंशी (१८) हा जागीच ठार झाला होता तर त्याच्यासोबत चे वासुदेव संतोष जव्हेरी (१९) व तेजस सुनील चित्ते हे गंभीर जखमी झाले होते.भररस्त्यावर दोन वाहनांच्या धडकेमुळे झालेल्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता तेथे त्यांना हृदयद्रावक चित्र दिसले. नागरिकांनी पोलिसांना खबर देण्यासह अपघातग्रस्त वाहनातील जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. यात इंडिका कार मधील मोहित सूर्यवंशी हा मयत झाल्याचे लक्षात आल्यानंतर वासुदेव व तेजसला नागरिकांनी शहादा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.लांबोळा ते डामरखेडा दरम्यान अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तिघे युवक हे तळोदा येथील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी रात्री उशिरा शहादा येथे धाव घेतली.