लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना साईटवर चेअरमन शिरीष नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान, सभेनंतर साखर कारखान्याचे चेअरमन व माजी व्हा.चेअरमन यांच्यात परस्परविरोधी झालेल्या पत्रकार परिषदांमध्ये एकमेकांवर आरोप करण्यात आले.मागील गाळप हंगामात गाळप झालेला ऊस, या वर्षात कार्यक्षेत्रात उपलब्ध असलेला ऊस, गेल्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद व यंदाच्या अंदाजित खर्चास सभेत मान्यता देण्यात आली. कारखान्याचे संस्थापक व्हाईस चेअरमन माणिकराव गावीत यांनी सभेत मार्गदर्शन केले. विषयसूचीनुसार विषयांचे वाचन दिलीप पवार यांनी केले. सभेत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.गेल्या आर्थिक वर्षाच्या प्रगतीच्या अहवालाचे वाचन चेअरमन शिरीष नाईक यांनी केले. साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आमदार सुरुपसिंग नाईक, व्हाईस चेअरमन सखाराम महाराज, सर्व संचालक, कार्यकारी संचालक विजयानंद कुशारे, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.कारखान्यात मनमानी कारभार-भरत गावीत यांचा आरोपआदिवासी व सर्वसामान्य शेतक:यांच्या सर्वागिण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या आदिवासी सहकारी साखर कारखान्यात चेअरमन व कार्यकारी संचालक यांचा मनमानी कारभार सुरु असून एकूणच सावळा गोंधळ सुरु आहे, असा आरोप माजी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक भरत गावीत यांनी पत्रकार परिषदेत केला. कारखान्याच्या वार्षिक सभेचे अजेंडे सभेच्या किमान 15 दिवस आधी सभासदांना दिले गेले पाहिजे होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही. कारखाना कर्मचा:यांना चार महिन्यापासून पगार नाही. त्यांना पगार किती हे सांगत नाही. पदाप्रमाणे पगार दिला जात नाही. नोकरी सोडून गेलेल्यांचा पगार दिला नाही. उस उत्पादनाचा टनेज वाढला नाही. मागण्यांसंदर्भात उत्तर न मिळाल्याने माहितीचा अधिकार टाकला. त्याचेही उत्तर नाही. संचालकांना कारखाना माहीती देत नाही तर सर्वसामान्य शेतक:यांची अवस्था काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.कारखान्यात राजकारण नको-चेअरमन शिरीष नाईकनिवडणूका जवळ येऊन ठेपल्यानेच राजकीय लाभ करुन घेण्याच्या इराद्याने हे आरोप करण्यात आले आहेत. कारखाना हा सर्वसामान्य शेतक:यांचा आहे. त्यामुळे त्यात राजकारण आणू नका, असे स्पष्टीकरण चेअरमन शिरीष नाईक यांनी पत्रकार परिषदेत केले. ते म्हणाले की, दोन पंचवार्षिकेत भरत गावीत व्हाईस चेअरमन व संचालक आहेत. त्यांनी मासिक बैठका वा इतर कोणत्याही बैठकांमधून ‘ब्र’ काढला नाही? कारखान्यात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी त्रिस्तरीय वेतन समितीकडून वेतन निश्चिती केली जाते. त्यानुसार वेतन दिले जाते. आजच्या घटकेस कुठल्याही कर्मचा:याची कुठलीही देणी बाकी नाही. शेतक:यांचे हित जोपासण्यासाठी चालूवर्षी एकरकमी प्रती मेट्रीक टन उसासाठी दोन हजार 308 रुपये दिले असून शेतकरी या रक्कमेत खूष आहेत. त्यांची पिळवणूक केली असती तर शेतक:यांनी मोर्च आणले असते. कारखाना चांगल्या स्थितीत चालू असून राजकारणाच्या वादात त्याचा बळी देऊ नका, असेही त्यांनी सांगितले.
आदिवासी कारखान्याचे चेअरमन आणि संचालक यांच्यात जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 12:33 IST