शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जानेवारीअखेर ुउपसा योजनांची चाचणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 11:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुडा साखर कारखान्यातर्फे बंद उपसा योजनांच्या 21 पैकी आठ योजनांची जानेवारी 2019 अखेर योजनांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुडा साखर कारखान्यातर्फे बंद उपसा योजनांच्या 21 पैकी आठ योजनांची जानेवारी 2019 अखेर योजनांच्या मुख्य            पाईप लाईन रायङिांगमेन व                 मुख्य वितरण चेंबरमध्ये पाणी             टाकून चाचणी घेण्याचे नियोजन  सिंचन विभागाकडून केले जात असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी       दिली.सातपुडा कारखान्याच्या संचालक मंडळाच्या झालेल्या सभेत उपसा योजनांच्या दुरुस्ती कामांचा आढावा घेण्ययात आला. कारखान्यातर्फे 22 बंद उपसा सिंचन योजनांपैकी 21 योजनांच्या           दुरुस्तीची कामे तापी पाटबंधारे विकास महामंडळातर्फे सुरू आहेत. नंदुरबार मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांच्या अखत्यारीत हे             काम सुरू आहे. दुरुस्ती सुरू असलेल्या 21 योजनांपैकी बिलाडी त.सा., पुसनद त.सा., दाऊळ मंदाणे, ता.शिंदखेडा, श्री विध्यासिनी अक्कडसे लार्ज धमाणे, सौ.कमलताई विरदेल या पाच उपसा योजनांच्या व्यवस्थापक कमिटीच्या विनंती अर्जानुसार त्या योजनांच्या थकीत वीज बिलाचा प्रथम हप्ता          योजनांच्या वतीने कारखान्याने महावितरण कंपनीस अदा केला            आहे. तसेच श्री जयभवानी            निमगूळ, श्री दत्त सारंगखेडा, बामखेडा त.त. या तीन उपसा योजनांच्या व्यवस्थापक कमिटीच्या विनंती अर्जानुसार  त्यांचीही थकीत वीज बिलाचा प्रथम हप्ता भरण्यात        येईल. वरील आठ योजनांचा वीजपुरवठा पूर्ववत होऊन योजनांची चाचणी घेण्यात येईल. मुख्य             पाईप लाईनीत (रायङिांगमेन) व डिलेव्हरी चेंबरमध्ये पाणी टाकून चाचणी घेतल्यानंतर लाभक्षेत्रातील पाणी वितरण पाईप लाईनीमध्ये पाणी टाकून चाचणी घेण्यात               येणार आहे. स्लुईस व्हॉल्व्ह लावणे, चेंबर बांधणे व संबंधित दुरुस्तीची कामे मार्च 2019 अखेर होणे अपेक्षित आहे. या आठ योजनांच्या सर्व प्रकारची कामे झाल्यानंतर साधारणत: 13  हजार 310 एकर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित आहे. यापैकी तीन  हजार एकर क्षेत्रामध्ये ऊस लागवडीसाठी सातपुडा साखर कारखान्यातर्फे नियोजन करण्यात येत आहे.आठ उपसा योजना प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर सातपुडा साखर कारखान्यातर्फे ऊस लागवड होण्यासाठी नियोजन सुरू आहे. सुमारे        तीन हजार एकर क्षेत्रामध्ये ऊस लागवडीसाठी ऊस उत्पादक         सभासदांना कारखान्यामार्फत उधारी तत्वावर चांगल्या प्रतीचे ऊस जातीचे प्रमाणित बेणे देण्यात येणार आहे. प्रती एकरी एक          मेट्रीक टन एक डोळा लागण पद्धतीने लागवडीसोबत 20 गोण्या पुष्पकमल सेंद्रीय खत, कृषी निविष्ठा कारखान्यातर्फे देण्यात         येणार आहे. त्याबाबत कारखान्याच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे. ज्या शेतक:यांच्या प्रमाणित ऊस जातीचे प्लॉट असतील त्यांनी बेण्यासाठी राखून ठेवून कारखान्यास माहिती द्यावी. जेणेकरून संबंधित शेतक:यांना ऊस बेणे उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी दिली.