शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गुरुकूलनगरात वीज तारांवर झाड कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील होळतर्फे हवेली शिवारातील गुरुकुलनगरात लिंबाचे झाड अचानक जमिनीवर कोसळल्याने विजेच्या खांबावरील तारा लोंबकळल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील होळतर्फे हवेली शिवारातील गुरुकुलनगरात लिंबाचे झाड अचानक जमिनीवर कोसळल्याने विजेच्या खांबावरील तारा लोंबकळल्या आहेत. त्यामुळे जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. वीज वितरण कंपनीने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.शहरात मे हिटचा तडाखा बसत असताना तापमानाचा पारा ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेला आहे. अशातच वातावरणात वाऱ्याचा वेग वाढल्याने शुक्रवारी गुरुकुल नगरात दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास लिंबाई भवनाजवळ लिंबाचे झाड अचानक जमिनीवर कोसळले. झाड कोसळल्याने परिसरात असलेल्या एका वीज खांबावर झाडाच्या मोठ्या फांद्या अडकल्याने तारा लोंबकळल्या आहेत. परिसरात नेहमी कॉलनीतील रहिवाशांची ये-जा सुरू असते. लहान मुलेही अंगणात खेळतात. दुपारच्यावेळी उन्हामुळे सहसा नागरिक घराबाहेर पडत नाहीत. अन्यथा कोसळलेल्या झाडामुळे अनेकांना इजा झाली असती. लोंबकळणाºया तारांबाबत श्याम जगदाळे यांनी तात्काळ वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीने माहिती दिली. हे झाड कोसळल्याने कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसली तरी लोंबकळणाºया तारांमुळे इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीकडून तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.गुरुकुल नगर परिसरातील वीज खांबांवरील विद्युत तारा लोंबकळत असून त्यातच गेल्या दोन दिवसापासून वाºयाच्या वेगामुळे वीज तारांचे घर्षण होऊन ठिणग्या उडतात. त्यामुळे येणाºया जाणाºयांना इजा पोहोचू शकते. परिसरात वीज तारा लोंबकळत असल्याने पावसाळ्यात वादळवाºयामुळे वारंवार वीजपुरवठाही खंडित होऊन नागरिकांचे हाल होतात. त्यामुळे वीज वितरण कंपनीने या तारांना ताण देऊन दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.