शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

हरीत सातपुड्यासाठी वृक्ष संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील सातपुड्याच्या परिसराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी हरित सातपुडा अभियान राबविण्यात येणार असून या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील सातपुड्याच्या परिसराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी हरित सातपुडा अभियान राबविण्यात येणार असून या अभियानाच्या माध्यमातून मृदा, जल आणि वृक्ष संवर्धनावर भर द्यावा, तसेच ही जनचळवळ व्हावी यासाठी शिक्षकांची विशेष योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात हरित सातपुडा अभियानाच्या नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अविश्यांत पांडा, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, संदीप कदम, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे आदी उपस्थित होते.डॉ.भारुड म्हणाले, गावपरिसरातील मोकळ्या जागेत मृदसंधारणाची कामे घेण्यात यावीत आणि पावसाळ्यात याठिकाणी वृक्षारोपण करण्यात यावे. वृक्षारोपण करताना स्थानिक पर्यावरणानुसार रोपांची निवड करावी. कृषी आणि वन विभागाने गाव तेथे नर्सरी उपक्रम राबवावा. नर्सरीसाठी नाविन्यपूर्ण योजना किंवा सीएसआरमधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. शाळेच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाची माहिती प्रात्यक्षिकांसह द्यावी. प्रत्येक गावाचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. माथा ते पायथा जलसंधारणाचे काम करून वृक्षारोपण करावे.जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळेच्या शिक्षकांनी जनजागृतीचे काम करावे. वृक्ष संवर्धनाची नवी संस्कृती निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक घटकाचे योगदान महत्वाचे आहे. असे केल्यास गावातून होणारे स्थलांतर कमी होऊन जंगलातील उत्पादनाचा आर्थिक लाभ स्थानिकांना होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अक्कलकुवा, धडगाव, तळोदा आणि शहादा या भागातील वृक्षारोपण अभियानाचे संनियंत्रण तीन अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत करण्यात येऊन गावपातळीपर्यंत प्रत्येक घटकाची आणि यंत्रणेची अभियानातील भूमीका निश्चित करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.वृक्षतोडीपासून होणारे नुकसान जनतेला समजावून सांगावे, १४ वा वित्त आयोग आणि पेसातील निधीच्या @२५ ते ४० टक्के हिस्सा मृद, जल आणि वन संवर्धनासाठी उपयोगात आणावा, असे आवाहनही त्यांनी केले. श्रीमती धोडमिसे यांनी सादरीकरणाद्वारे अभियानाची माहिती दिली. मनरेगा, सीएसआर, नगरपालिका आदी माध्यमातून हे अभियान राबविण्यात येणार आहे. आंबा, महूआ, साग, बांबू, आवळा, सीताफळ आदी उपयुक्त झाडे लावण्यावर भर देण्यात येणार आहे.