शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

ऑनलाइन नोंदणीअभावी रखडला निधी

By admin | Updated: February 3, 2017 00:47 IST

तळोदा तालुका : 188 घरकुल लाभाथ्र्याचे बँक खाते नसल्याने नोंदणी प्रक्रियेत खोडा

 

तळोदा : बँकेच्या खात्याअभावी प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांसाठी लाभार्थीची ऑनलाइन नोंदणी रखडली आह़े परिणामी निधीचेही वितरण थकले आह़े जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी चौकशी करून लाभार्थीचे खाते उघडण्याबाबत सक्त ताकीद द्यावी अशी लाभार्थीची अपेक्षा आह़े प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तळोदा तालुक्यात यंदा साधारण              694 घरकुले मंजूर करण्यात                आली आह़े येथील पंचायत समितीच्या प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायतीकडून ग्रामसभेत निवड करण्यात आलेल्या यादीतील नावे निश्चित करण्यात आली आह़े                 थेट लाभार्थीच्या खात्यावर   घरकुलाचा निधी जमा करण्याचे  स्पष्ट आदेश असल्यामुळे या लाभार्थीची ऑनलाइन नोंदणी करण्यात येत आह़े तथापि काही बँकेच्या अधिका:यांच्या मनमानी आणि उदासीन धोरणामुळे लाभार्थीचे  खाते नंबर उपलब्ध होत                         नाही़ परिणामी नोंदणीदेखील रखडली आह़े यामुळे प्रशासनास संबंधित लाभार्थीच्या खात्यावर निधीदेखील वर्ग करता येत नसल्याचे सांगण्यात येत आह़े वास्तविक खाते उघडण्यासाठी लाभार्थी आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांकडे सातत्याने जात आह़े परंतु बँकेचे अधिकारी               दाद देत नाही़ याउलट नंतर                येण्याचे सांगत टाळाटाळ करीत असल्याचे लाभार्थीचे म्हणणे                 आह़े एवढेच नव्हे तर लाभार्थीच्या बँक खात्यासाठी पंचायत समिती प्रशासन व संबंधित गावांचे ग्रामसेवकदेखील बँकाकडे लाभार्थीच्या खात्याबाबत विचारणा करतात़ आधीच प्रधानमंत्री                आवास योजनेच्या यंत्रणेने योजना राबविताना कालमर्यादा घालून दिलेली आह़े त्यामुळे घरकुलेही वेळेत                  पूर्ण करण्याचे आदेश आहेत़                  परंतु लाभार्थीच्या बँक खात्याअभावी नोंदणी प्रक्रियेत खोडा घातला जात आह़े पंचायत समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार बोरद, न्यूबन, करडे, लाखापूर, खरवड व त:हावद या गावांमधील लाभार्थीचे बँक खाते अजूनपावेतो मिळालेले नाही़  याबाबत संबंधित बँकेकडेसुध्दा पाठपुरावा सुरू आह़े मात्र बँकेचे सहकार्य मिळत नसल्याची व्यथा अधिका:यांनी बोलून दाखविली़ जिल्हा प्रशासनाने लाभार्थीच्या खात्यांबाबत चौकशी करून बँक अधिका:यांच्या मनमानी कारभारावर अंकुश लावावा, अशी लाभार्थीची मागणी आह़े दरम्यान, ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया कालमर्यादित असल्यामुळे संबंधित यंत्रणेकडून लाभार्थीच्या माहितीसाठी सातत्याने तगादा लावला जात आह़े मात्र लाभार्थीच्या बँक खात्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत़ वास्तविक शासनाने घरकुलांसाठी निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आह़े अशी स्थिती असताना काही बँकांच्या मनमानी धोरणामुळे निधीचे वाटप रखडले असल्याने लाभार्थी यापासून वंचित राहत असल्याने त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आह़े घरकूल योजनेसाठी अनेक लाभार्थी आपल्या हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आह़े अशा ढिसाळ कारभारामुळे त्यांच्या मनाचा हिरमोड होत असल्याचे वृत्त आह़े अनेक लाभार्थी या कारभारावर नाराज    असून प्रशासनाने यावर तातडीने   काही उपाययोजना आखून  ऑनलाइन नोंदणीबाबत निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आह़े    (वार्ताहर)तालुक्यातील मंजूर घरकुलांपैकी अजूनही पावणेदोनशे लाभार्थीची ऑनलाइन नोंदणी बाकी आह़े त्यांचे बँक खाते नंबर उपलब्ध झालेले नाही़ बँक खात्यासाठी सेंट्रल बँकेच्या बोरद शाखेकडे वारंवार मागणी केली आह़े खाते नंबर मिळाल्याबरोबर तातडीने ऑनलाइन नोंदणी केली जाईल़-शरद मगर, गटविकास अधिकारी, तळोदा़बँकेच्या कार्यक्षेत्रातील घरकूल लाभार्थीचे बँकेतील खाते उघडण्याची कार्यवाही सुरू आह़े दोन दिवसात सर्व लाभार्थीना खाते पुस्तक दिले जाईल़-जितेंद्र कुमार, शाखा व्यवस्थापक, सेंट्रल बँक, बोरद.