शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनी साजरा केला आनंदोत्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 11:09 IST

प्रवाशांची सोय : हातोडामार्गे मिनीबस सुरू, फे:या वाढविण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : बहूप्रतीक्षित तळोदा ते नंदुरबार बस शनिवारपासून हातोडा पूलमार्गे सुरु करण्यात आल्याने या परिसरातील प्रवासी व नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला. याबाबत ‘लोकमत’नेदेखील आवाज उठविला होता. दरम्यान, शनिवारी या बसच्या दोनच फे:या झाल्या होत्या. आणखी फे:या वाढविण्याची मागणी होत आहे.गुजरात राज्याच्या हद्दीतील तापी नदीवरील हतोडा पूल नुकताच सुरु करण्यात आला आहे.  सध्या पुलावरुन अवजड वाहनांव्यतिरिक्त इतर चारचाकी वाहनांबरोबरच स्कूल बसला वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिनीबसला परवानगी नव्हती. साहजिकच प्रवाशांना खाजगी चारचाकी वाहनांचा आसरा घ्यावा लगात होता. प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन हे खाजगी प्रवासी वाहतूक करणारे वाहनधारक जादा भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक लूट करीत असल्याच्या आरोप होता. त्यांच्या मनमानीने प्रवाशी अक्षरश: वैतगले होते. त्यामुळे हातोडा पूलमार्गे तलोदा ते नंदुरबार मिनी बस सुरु करावी यासाठी सातत्याने मागणी होत होत होती. परंतु राज्य परिवहन महामंडळ व  सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या उदासीनतेमुळे बस सुरु होण्यास विलंब होत होता. मात्र जनतेने पुन्हा रेटा लावला व आमदार उदेसिंग पाडवी यांनीही परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रांकडे पाठपुरावा केला. परिणामी या दोन्ही यंत्राणांकडून सकारात्मक दखल घेवून अखेर शनिवारी नंदुरबार आगाराची मिनी बस सुरु करण्यात आली. या बसने दोन फे:या मारल्या होत्या. चालक-वाहकांचा सत्कारहातोडा पूलमार्गे नंदुरबार ते तळोदा मिनी बस सुरू झाल्याने नागरिकांनी फटाके फोडून   आनंदोत्सव साजरा केला. तसेच नागरिकांनी या बसचे चालक व वाहकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बसची पूजा करून आरतीही करण्यात आली. चालक व वाहकांचा शाल, श्रीफळ  देवून सत्कार करण्यात आला. या वेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती