शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा नजीक अवजड वाहनांची वाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 13:04 IST

प्रकाशा बसथांबा ते केदारेश्वर मंदिर रस्ता : रस्ता रोको आंदोलनानंतरही दुर्लक्ष

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : सहा दिवसांपूर्वी येथील केदारेश्वर मंदिराजवळील वळण रस्त्यावर अवजड वाहनामुळे झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नागरिकांनी रस्ता रोको करून अवजड वाहनांना बंदीसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या मार्गावरून अवजड वाहनांची ये-जा सुरूच असल्याने किरकोळ अपघात होत आहेत.प्रकाशा येथील बसथांब्यापासून तीन रस्ते जातात. तळोदा, शहादा व केदारेश्वर मंदिराकडे जाणारे रस्ते आहेत. त्यापैकी केदारेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता हा अरुंद व वळणाचा आहे. तसेच या रस्त्यावर केदारेश्वर मंदिर, सवरेदय विद्या मंदिर, जिल्हा परिषदेच्या शाळा, इंग्रजी माध्यम व प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने विद्यार्थी, भाविक,  रुग्ण व कर्मचा:यांची नेहमी वर्दळ राहत असल्याने अवजड वाहनांना बंदी आहे. अवजड वाहनांना बंदी दर्शविणारा फलकही बसथांब्याजवळ लावण्यात आला आहे. मात्र वाहन चालक या सूचनेला न जुमानता सर्रासपणे वाहने नेतात. अवजड वाहनांमुळे नेहमी लहान-मोठे अपघात होतात.16 मे रोजी कवळीथ येथील अभियंता रितेश पाटील हे डय़ुटीवर मोटारसायकलीने जात असताना केदारेश्वर मंदिराजवळील वळणावर समोरुन येणा:या अवजड वाहनाने त्यांना धडक देऊन फरफटत नेले. या घटनेत रितेश पाटील यांचा मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी तापी नदी पुलावर रस्ता रोको आंदोलन करून हा रस्ता अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला. मात्र पाच दिवस झाले तरी अवजड वाहनांच्या वाहतुकीसंबंधी काहीही कार्यवाही झाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अवजड वाहनांची ये-जा सुरूच आहे. पाच दिवसात किमान एका वाहतूक पोलीस कर्मचा:याची नेमणूकही झालेली नाही. 18 मे रोजी दोन शिक्षक शहाद्याकडे जात असताना अवजड वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला कट मारला. त्यात दोन्ही जण खाली पडल्याने हाता-पायाला किरकोळ जखमा झाल्या. तसेच रविवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील वळणावर नंदुरबारकडून येणा:या अवजड वाहनाची धडक मोटारसायकलस्वाराने प्रसंगावधान राखून टाळली. या रस्त्यावर मोटारसायकलस्वार जीव धोक्यात घालून प्रवास करीत असून पोलीस प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.लोखंडी कमान उभारावीप्रकाशा बसथांबा ते केदारेश्वर मंदिर पुलार्पयतच्या रस्त्यावर अवजड वाहने जाऊ नये यासाठी बसथांबा व पुलाजवळ लोखंडी  कमान उभारून अडथळा तयार करण्याची गरज आहे.  तसेच वाहनांच्या वेगावर नियंत्रणासाठी केदारेश्वर मंदिराजवळील वळण रस्त्याच्या दोन्ही बाजूला,           प्राथमिक आरोग्य केंद्र, आसारामजी आश्रम, सवरेदय विद्या मंदिर, जिल्हा परिषद शाळेजवळ गतिरोधक तयार करण्याची मागणी होत आहे.