शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात जलशुद्धीकरण प्रकल्पाचा हस्तांतर कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 12:52 IST

मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन : दोन लाख लिटर पाणी शुद्ध करण्याची क्षमता

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरासाठी बहुप्रतिक्षित असलेल्या जलशुध्दीकरण प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा शनिवारी पार पडला. हा प्रकल्प आता पालिकेच्या ताब्यात आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीयमंत्री माणिकराव गावीत यांच्या हस्ते हस्तांतरण करण्यात आले. या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावीत, नगराध्यक्षा रेणूका गावीत, उपनगराध्यक्ष हारुन खाटीक, पालिकेचे गटनेते गिरीष गावीत, विरोधी पक्ष प्रमुख नरेंद्र नगराळे, माजी नगरसेवक विनय गावीत, भालचंद्र गावीत, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा.नवल पाटील, विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक, पालिका मुख्यालयातील राजेंद्र शिंदे, कार्यालय अधीक्षक मिलींद भामरे, अभियंता सुधीर माळी, आर.सी. गावीत, संदीप गावीत, फारुख शाह, जैनु गावीत, जीवन प्राधीकरण विभागाचे अभियंता बी.बी.बागुल, जळगाव केंद्राचे  एस.सी. निकम, अभियंता एम.आर. जाधव, सतिष बागुल, हेमंत जाधव, परशराम ठाकरे, राजू गावीत, वामन अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. दैनंदिन दोन लक्ष लिटर पाणी शुध्द करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाची सुरुवात  सन 2007 साली करण्यात आली. सन 2012 मधे प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन पाच वर्ष लोटली होती. डिसेंबर 2014 पासून प्रकल्पातून शुध्द पाण्याचे वितरण  सुरु करण्यात आले. प्रकल्पाची उभारणी महामार्गा लगत करण्यात आली असून जलशुध्दीकरण संयंत्र, कर्मचारी निवासस्थान यासह          जलकुंभ उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून एक कोटी 96 लक्ष           37 हजार रुपये खर्चाच्या या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. माणिकराव गावीत यांनी हा प्रकल्प पालिकेची मोठी उपलब्धी असल्याचे सांगितले. शहरातील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत गटार योजना पूर्णत्वाकडे असून लोकविकासाच्या असंख्य योजना राबविण्यात आल्याने   शहराचा चेहरा मोहरा बदलला असल्याचे ते म्हणाले. प्रस्तावित करतांना गटनेते          गिरीष गावीत यांनी प्रकल्पाची  तांत्रिक व प्रशासकीय माहिती             दिली. शहर विकासाचा महत्वाचा टप्पा या प्रकल्पामुळे गाठला गेला असून लवकरच नागरिकांना           शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. नागरिकांच्या पोटाच्या विकारांनाही पूर्ण विराम मिळू          शकेल असे ते म्हणाले. शहरात                 या पंचवार्षिकेत झालेल्या कल्याणकारी योजनांची माहिती देतांना निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाल्याचे शेवटी ते म्हणाले.