शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त बोकळझरचा झाला ‘कायापालट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 12:19 IST

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूर तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज म्हणून एप्रिल महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार देऊन गौरवलेल्या बोकळझर गावाला गेल्या 17 ऑगस्ट रोजी पुराचा फटका बसला होता़  यातून अवघ्या दीड महिन्यात हे गाव सावरले असून पुन्हा स्मार्ट व्हिलेज म्हणून ओळख प्राप्त करण्याच्या वाटेवर आह़े नवापूर शहराच्या दक्षिणेला आठ ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूर तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज म्हणून एप्रिल महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार देऊन गौरवलेल्या बोकळझर गावाला गेल्या 17 ऑगस्ट रोजी पुराचा फटका बसला होता़  यातून अवघ्या दीड महिन्यात हे गाव सावरले असून पुन्हा स्मार्ट व्हिलेज म्हणून ओळख प्राप्त करण्याच्या वाटेवर आह़े नवापूर शहराच्या दक्षिणेला आठ किलोमीटर अंतरावर टुमदार असे बोकळझर गाव आह़े केवळ 834 लोकसंख्या आणि उणीपुरी 200 घरे असलेल्या या गावाने 17 ऑगस्टच्या रात्री नजीकच वाहणा:या रंगावली नदीचे रौद्ररुप अनुभवल़े काही कळण्याच्या आत गावातील 33 घरे, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा पाण्याखाली गेली़ गावातील रस्त्यांवरुन पाणीच पाणीच झाल्याचे दिसून आल्यानंतर ग्रामस्थांची धावपळ सुरु झाली़ रात्रभराच्या या हाहाकारानंतर सकाळी पूर ओसरल्यावर गावात गाळ आणि वाहून आलेली झाडेच होती़  प्रशासनातील अधिका:यांना सरपंच राहुल गावीत यांनी माहिती दिल्यानंतर पंचनामे सुरु झाल़े जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांनी ग्रामस्थांना वस्तूंच्या स्वरूपात मदत केली़ गावातील ज्यांची घरे चांगली होती त्या ग्रामस्थांनी घरे वाहून गेलेल्यांना आधार दिला़ या आधारातून पुन्हा नव्याने स्मार्ट व्हिलेज उभारण्याचा संकल्प झाला आणि कामाला सुरूवात झाली़ 18 ऑगस्टच्या दुपारसत्रानंतर ग्रामस्थांनी चक्क पावडी, कुदळ, कु:हाडी, टोपल्या घेत गाळ उपसा आणि झाडे काढून फेकण्यास सुरूवात केली़ सरपंच राहुल गावीत यांनी ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टरद्वारे स्वच्छता सुरू केली़ सर्व सात ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील युवक, पुरूष आणि महिलांचे 10-10 गट तयार करून रस्ते वाटून घेतल़े त्यावर प्रत्येकाने सात ते आठ तास श्रमदान करत पूरग्रस्त गाव ते पुन्हा स्मार्ट व्हिलेज असा प्रवास अवघ्या 15 दिवसात पूर्ण करून दाखवला आह़े पूराची घटना घडून 45 दिवस उलटले आहेत़ तालुक्यात 18 कोटी रुपयांचे नुकसान झाले आह़े परंतू बोकळझर ग्रामपंचायत, शाळा आणि अंगणवाडी येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या डिजीटल साहित्याची भरपाई मात्र प्रशासनाने केलेली नाही़ स्वबळावर उभ्या राहणा:या या गावाने प्रशासनापुढे हातही पसरला नाही हे विशेष़ ग्रामसेविका कल्पना वसावे, उपसरपंच अमित गावीत यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील ज्येष्ठ, अंगणवाडी सेविका,शिक्षक आणि ग्रामस्थांनी या कार्यात वाटा उचचला आह़े