प्रकाशा-शहादा रस्त्याचे काम सुरू असून, कोकणी माता ते डामरखेडा पुलादरम्यान रस्त्याचे काम तीन वर्षांपासून अपूर्ण आहे. कोकणी माता मंदिराजवळील एका शेतकऱ्याच्या वादग्रस्त प्रकरणामुळे हे काम रखडले आहे. या ठिकाणी जुना रस्ता व नव्याने तयार झालेला रस्ता समांतर नसल्याने अपघात होत आहेत. शनिवारी सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास प्रकाशाकडे येणारा ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूला गोरख खंडू सूर्यवंशी यांच्या शेताजवळ उलटून अपघात झाला. या अपघातामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. प्रकाशा दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी सुनील पाडवी व पंकज जिरेमाळी यांनी वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर, रात्री १० वाजता जेसीबीद्वारे ट्रक बाहेर काढण्यात आला. याबाबत कुणाचीही तक्रार नसल्याने सकाळी ट्रक घेऊन चालक गुजरातकडे रवाना झाला.
शहादा रस्त्यावर ट्रक उलटल्याने वाहतुकीला अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:35 IST