शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

हातोडा पुलाला भगदाड पडल्याने तळोदा-नंदुरबार वाहतूक थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 12:29 IST

तळोदा : शहराजवळील तापीनदीवर बांधलेल्या हातोडा पुलास मोठे भगदाड पडल्यामुळे पूल खचत असल्याच्या भितीने वाहनधारकांमध्ये भिती पसरली़ भगदाडामुळे पुलावरुन ...

तळोदा : शहराजवळील तापीनदीवर बांधलेल्या हातोडा पुलास मोठे भगदाड पडल्यामुळे पूल खचत असल्याच्या भितीने वाहनधारकांमध्ये भिती पसरली़ भगदाडामुळे पुलावरुन अवजड वाहतूकीस बंदी करण्यात आली आह़े भगदाड पडल्याची माहिती प्रशासनाने संबधित विभागास कळवल्यानंतर अभियंत्यांच्या पथकाने याठिकाणी भेट देत पाहणी केली़ भगदाड पडल्याने पुलाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आह़े हातोडा पुलावरील उजव्या बाजूच्या कोप:याकडील भाग खाली खचल्यामुळे मोठे भगदाड पडले आह़े हा प्रकार दिसून आल्यानंतर वाहनधारकांनी प्रशासनाला माहिती दिली होती़ त्यानुसार पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी तातडीने भेट देत पाहणी केली़ भगदाडाचे गांभिर्य लक्षात घेऊन त्यांनी प्रशासनाला माहिती दिली़ नायब तहसीलदार रामजी राठोड, एस़पी़ गवते, मंडळाधिकारी समाधान गवते हे याठिकाणी हजर झाले होत़े त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अनिल पवार यांना माहिती दिली होती़ याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता वर्षा पवार यांच्यासोबत संपर्क केला असता, त्या म्हणाल्या की, खड्डा पडल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पाहणीसाठी अभियंत्यांना पाठवले आह़े पावसामुळे हा प्रकार घडण्याची शक्यता आह़े येथील वाहतूकीच्यादृष्टीने तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना संबधितांना दिलज्या आहेत़ दरम्यान पुलावर भगदाड पडल्यामुळे मार्गावर होणा:या बससेची वाहतूक बंद करण्यात आली आह़े मार्गावरुन अवजड वाहनांची वाहतूक बंद करुन त्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े