शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांकडून नंदुरबारात ई-चलन प्रणाली कार्यान्वीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाहतूक शाखेतर्फे वाहन चालकांवर कारवाईसाठी शुक्रवार 24 पासून ई-चलान प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वाहतूक शाखेतर्फे वाहन चालकांवर कारवाईसाठी शुक्रवार 24 पासून ई-चलान प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. या उपकरणांचे वाटप पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या हस्ते कर्मचा:यांना करण्यात आले. वाहनचालकांकडून ऑनलाईन दंड आकारणे व वाहनधारकांना कारवाईबाबत एसएमएस द्वारे सुचीत करण्यात येणार आहे. शहरातील वाहतुकीची समस्या मोठी आहे. वाहतूक कर्मचा:यांना त्यासाठी मोठी कसरत करावी लागते. उन, वारा, पाऊस अशा वातावरणात काम करतांना दंडाची पावती फाडावी लागते. अशा वेळी वाहनचालकांकडून वादही घातले जात असतात. त्यामुळे कारवाईत अडथळा येतो. ही बाब लक्षात घेता मोठय़ा शहरांमध्ये ई-चलान प्रणालीचा वापर केला जातो. त्याचाच वापर आता नंदुरबारातही करण्यात येणार आहे. नंदुरबारात ही प्रणाली यशस्वी झाल्यास शहादा, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा येथे त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या प्रणाली अंतर्गत वाहनधारकाने वाहतूक कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांना ई-चलान उपकरणाद्वारे ऑनलाईन पद्धतीने दंड आकारण्यात येणार आहे. याद्वारे एटीएम किंवा डेबीट कार्डद्वारे दंडाची रक्कम किंवा पेमेंट भरता येणार आहे. वाहनधारकांना त्यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत एसएमएसची सुविधा उपलब्ध होणार आहे. तत्पर कारवाईचे फोटो घेण्याची सुविधाही राहणार आहे. नागरिकांसाठी महाट्रॅफिक अॅपची सुविधा देखील राहील. या उपकरणांचे वितरण वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचा:यांना 24 रोजी करण्यात आले. पोलीस अधीक्षक कार्यालयात संजय पाटील यांनी त्यांचे वितरण केले. यावेळी त्यांनी या प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करून आपल्या कामाला गती देण्याचे आवाहन कर्मचा:यांना केले. वाहतुकीचे नियोजन सुव्यवस्थित करून कारवाई करतांना सौजन्याने वागावे अशाही सुचना त्यांनी यावेळी दिल्या. पोलीस निरिक्षक भोये, राहुल शेजवळ उपस्थित होते.