शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात अतिक्रमणामुळे वाहतुकीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 12:50 IST

शहादा येथील स्थिती : दोंडाईचा रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांनी हातगाडीवर थाटली दुकाने

<p>शहादा : शहरातील दोडाईचा रस्त्यावर शासकीय विश्रामगृह ते स्टेट बँकेसमोरील चौकात भररस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असून हा चौक अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.                 पोलीस व पालिका प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहादा शहरातील सर्व रस्त्यांवर भाजीपाला विक्रेते व हातगाडीधारकांनी अतिक्रमण करण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्या अतिक्रमणामुळे रहदारीचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे. मुख्य रस्त्यावरील व भाजी मार्केटमधील विक्रेते व हातगाडीधारकांच्या मनमानी पध्दतीने होत असलेल्या अतिक्रमणाबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेत पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवत 15 दिवसांपूर्वी  भाजी मार्केटमधील अतिक्रमणे काढली. त्यासोबतच हातगाडी धारकांच्या मनमानी अतिक्रमणाला लगाम लावला होता. मात्र नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे पालिका व पोलीस प्रशासनाने कारवाईत सातत्य न ठेवल्याने भाजी मार्केटमध्ये पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती होत आहे. सोबतच हातगाडीधारकही रस्त्यावर कुठेही उभे राहून रहदारीचा प्रश्न निर्माण करीत आहे.  त्यासोबतच आता भाजीपाला विक्रेत्यांनी व हातगाडीधारकांनी हा अतिक्रमणाचा  मोर्चा दोंडाईचा रोडवरील शासकीय विश्रामगृह ते स्टेट बँकेसमोरील चौक व तेथून थेट खरेदी-विक्री संघार्पयत रस्ता काबीज करीत या मुख्य रस्त्यावर व्यवसाय थाटले आहेत. शहरात  दोंडाईचा रस्ता हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर रहदारीची वर्दळ मोठय़ा प्रमाणावर आहे.  या रस्तालगतच शैक्षणिक संस्था, बँका, पंचायत समिती, शासकीय विश्रामगृह यासह व्यापारी संकुले असल्याने रहदारी मोठय़ा प्रमाणात आहे. नेमक्या याच रस्त्यावरील चौकापासून ते मुख्य रस्त्यालगत 30 ते 40 भाजीपाला व्यावसायिकांसह हातगाडी धारकांनी अतिक्रमण करीत रहदारीचा प्रश्न गंभीर बनवला आहे. भाजी मार्केटमधीलच काही विक्रेत्यांसह ग्रामीण भागातील व्यावसायिकांनीही हा रस्ता काबीज करीत कोणाचाच धाक नसल्याचे दाखवत अतिक्रमण केले आहे. दिवसेंदिवस या अतिक्रमणात वाढच होत आहे. त्यांच्या मनमानी अतिक्रमणामुळे लहान-मोठे अपघातही होत असून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकारही वाढत आहे. या संवेदनशील रस्त्यावरील अतिक्रमणामुळे रहदारीचा प्रश्न वेगळे वळण घेत असल्याने पोलीस व पालिका  प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष चिंतेचा विषय ठरत आहे. या रस्त्यावरील व्यावसायिकांची अतिक्रमणे तात्काळ हटवली नाही तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे    पालिका व पोलीस प्रशासनाने पुन्हा  संयुक्त मोहीम राबवून ही अतिक्रमणे तात्काळ हटविण्याची मागणी होत आहे.