शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुंदलवडच्या 106 वर्षे जुन्या चर्चमध्ये नाताळनिमित्त पहाटेच्या प्रार्थनेची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 12:45 IST

धडगाव : सातपुडय़ाच्या दुर्गम भागात  धडगाव तालुक्यातील मुंदलवड येथे नंदुरबार जिल्ह्यातील पहिले चर्च स्थापन करण्यात आले होत़े येथून पुढे ...

धडगाव : सातपुडय़ाच्या दुर्गम भागात  धडगाव तालुक्यातील मुंदलवड येथे नंदुरबार जिल्ह्यातील पहिले चर्च स्थापन करण्यात आले होत़े येथून पुढे नंदुरबार जिल्ह्यात ािस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार सुरु झाला़ केवळ धर्मप्रसारापुरतेच न मर्यादित राहता मुंदलवड येथे गोरगरीब आदिवासी विद्याथ्र्यासाठी 1904 सालापासून प्राथमिक शाळेलाही सुरुवात करण्यात आल्याची माहिती आह़ेब्रिटीश शासनकाळात स्वीडन येथून भारत भेटीवर आलेल्या ए़बी़फ्रँकलीन यांनी सातपुडय़ात 1902 साली भेट दिल्याची माहिती आह़े या भेटीदरम्यान त्यांनी मुंदलवड येथे चर्च उभारणीसाठी जागा पाहून धर्माच्या प्रचार आणि प्रसाराला सुरुवात केली होती़ त्यांच्या मानवतावादी दृष्टीकोनाला साद देत परिसरातील अनेकांनी सहकार्य केले होत़े यातून 1904 पासून मुंदलवड येथे चर्च सुरु करण्यात आल़े या चर्चची इमारत पुढे 1922 साली बांधण्यात आली़ जिल्ह्यातील सर्वात पहिले चर्च अशीही त्याची ख्याती असल्याचे सांगण्यात येत़े या चर्चमध्ये वर्षभर मुंदलवड येथे राहणा:या 83 ािस्ती परिवारांकडून भक्ती करण्यात येत़े प्रत्येक बुधवारी एकत्रित प्रार्थना, रविवारी लहान मुलांचा वर्ग, शुक्रवारी महिला मंडळाची बैठक आणि शनिवारी तरुणसंघाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतो़ नाताळनिमित्त याठिकाणी विविध कार्यक्रमांची तयारी सध्या वेगाने सुरु आह़े दुर्गम भागातील या चर्चमध्ये नाताळच्या दिवशी पहाटेपासून केवळ मेणबत्ती हाती घेऊन दिवस उजाडण्यापूर्वी ािस्ती बांधवांकडून प्रार्थना करण्यात येत़े विश्व आणि मानव कल्याणासाठी मेणबत्तीच्या प्रकाशात ही प्रार्थना करण्यात येत असल्याची माहिती येथील रेव्हरंड विरेंद्र गार्दी यांनी दिली़ नाताळसाठी मुंदलवड आणि धडगाव अशा दोन्ही चर्चचे सुशोभिकरण करण्यात येत आह़े या चर्चमध्ये नाताळनिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रम रंगणार आहेत़