शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

धावलघाटात ट्रॅक्टर उलटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 22:00 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव :  शहादा ते धडगाव दरम्यान धावलघाटात मजूरांनी भरलेले ट्रॅक्टर उलटून ३५ च्या जवळपास मजूर ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव :  शहादा ते धडगाव दरम्यान धावलघाटात मजूरांनी भरलेले ट्रॅक्टर उलटून ३५ च्या जवळपास मजूर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. घटनेनंतर जखमी मजूरांना तातडीने म्हसावद ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. धडगाव तालुक्यातील वलवाल मोखाचापडा  येथील मजूर ऊसतोडणीसाठी शहाद्याकडे जात होते. दरम्यान दावलघाटात या मजूरांचे ट्रॅक्टर आल्यानंतर अचानक ट्राॅली उलटून मजूर त्याखाली दाबले गेले. अपघात होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ज्यांना शक्य होते त्यांनी उड्या मारुन जीव वाजवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कूटूंब आणि संसारोपयोगी साहित्यासह हे मजूर कामाच्या ठिकाणी निघाले होते. काहींसोबत लहान मुलेही होती. या अपघातात तीन पुरूष व एक महिला गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान अपघात घडल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य विजय पराडे, ॲड. छोटू वळवी, रेहमल पावरा, फिरंग्या पावरा यांनी कार्यकर्त्यांसह धाव घेत जखमींना म्हसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. पोलीसात नोंद करण्याचे काम सुरू असल्याची माहिती असून जखमींवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान धडगाव ते शहादा हा रस्ता खराब झाला असल्याने अपघात घडला असावा अंदाज आहे. सध्या मोठ्या संख्येने मजूर दुर्गम भागातून स्थलांतर करत आहेत. यासाठी ते मिळेल त्या वाहनाचा वापर करत असून यातून अपघाती स्थिती निर्माण होत आहे. प्रशासनाने याकडेही गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.