शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेवर अत्याचार करणा:या युवकास सात वर्ष सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 11:54 IST

नंदुरबार : नवापूर येथील अल्पवयीन बालिकेवर तरुणासह अल्पवयीन मुलाने केलेल्या अनैसर्गिक अत्याचारप्रकरणी न्यायालयाने युवकास दोषी ठरवून सात वर्ष सश्रम ...

नंदुरबार : नवापूर येथील अल्पवयीन बालिकेवर तरुणासह अल्पवयीन मुलाने केलेल्या अनैसर्गिक अत्याचारप्रकरणी न्यायालयाने युवकास दोषी ठरवून सात वर्ष सश्रम कारावास व 12 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दुस:या अल्पवयीन मुलावर बाल न्यायालयात खटला सुरू आहे. नवापूर येथील बेलदार वाडा भागात पिढीत अल्पवयीन बालिका राहते. त्याच भागात दोन घरे सोडून राहणारा फय्याज गुलाब खाटीक व त्याचा अल्पवयीन भाऊ राहत होता. त्यांच्या घरात पाळलेले मांजर आणि फिशटँक असल्याने बालिका ते पहाण्यासाठी नेहमीच तेथे जात होती. या ओळखीचा फायदा घेवून आधी फय्याज याने शेकोटीसाठी कचरा गोळा करण्याच्या बहाण्याने घेवून जावून एका घराच्या स्नानगृहात तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. दुस:या दिवशी फय्याजचा भाऊ यानेही बालिकेला खेळायला जावू असे सांगून त्यांच्या घराच्या स्नानगृहात नेवून अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर दोघांनी तीन ते चार वेळा बालिकेवर अत्याचार केला. 15 जानेवारी 2016 रोजी देखील अत्याचार केला. अखेर मानसिकदृष्टया खचलेल्या बालिकेने  आई व काकूला ही बाब सांगितली. नंदुरबार येथे राहणा:या बालिकेच्या काकाला ही बाब सांगितल्यावर ते नवापूरात गेल्यावर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी दोघा भावांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला.  महिला पोलीस उपनिरिक्षक संगिता कदम यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. नंदुरबार येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात हा खटला चालला. न्या.राजेश गुप्ता यांनी सर्व साक्षीदार तपासले. पिढीत मुलगी, तिची काकू, आणखी एक बालसाक्षीदार व तपास अधिकारी संगिता कदम यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने फय्याज खाटीक यास सात वर्ष सश्रम कारावास, दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्त मजुरी, आणखी दुस:या कलमाअंतर्गत तीन वर्ष कारावास, दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. त्यापैकी सहा हजार रुपये पिढीत बालिकेस देण्याचे आदेश दिले. दुसरा अल्पवयीन आरोपीविरुद्ध बाल न्यायालयात खटला सुरू आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड.तुषार कापडीया यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार सुनील धनगर होते. सरकारी वकील, तपास व पैरवी अधिकारी यांचे पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा सरकारी वकिल सुशील पंडित यांनी कौतूक केले.