शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नंदुरबारात ठिकठिकाणी तंबाखूमुक्त होळी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 12:36 IST

स्त्युत्य उपक्रम : जिल्हाधिका:यांच्या आवाहनाला प्रतिसाद

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 4 : जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हाभरात विविध ठिकाणी तंबाखुमुक्त होळी साजरी करण्यात आली.जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या पुढाकाराने तसेच  सलाम मुंबई फाऊंडेशन आणि शिक्षण विभाग, जि.प. नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त अभियान राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून तंबाखूची प्रतीकात्मक होळी करून आजन्म तंबाखूजन्य पदार्थाचे स्वत: आणि इतरांना सेवन न करण्याचा संकल्प करावा असे आवाहन जिल्हाधिका:यांकडून करण्यात आले होत़े या आवाहनाला जिल्हाभरात चांगला प्रतिसाद लाभला असून जिल्ह्यात विविध ठिकाणी तंबाखूमुक्त होळी साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात युवारंग फाऊंडेशन नंदुरबारतर्फे व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणारी सायकल रॅली काढून परिसरातील गावांमध्ये जनजागृती करण्यात आली. सायकल रॅलीला जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी हिरवी ङोंडी दाखवून प्रारंभ केला होता़ प्रा.माधव कदम, उपजिल्हाधिकारी अनिल पवार, रवी गोसावी, डॉ.तेजल चौधरी, सपना अग्रवाल, सुलभा कोतवाल, सीमा मोडक आदी उपस्थित होते. जी.टी.पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात तंबाखुजन्य पदार्थांची होळी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एस.श्रीवास्तव यांनी तंबाखुजन्य होळी प्रज्वलीत करुन व्यसनाच्या दुष्परिणामाची माहिती विद्याथ्र्यांना दिली. नंदुरबार येथील यशवंत हायस्कुलच्या मैदानात अंधश्रद्धा, अनिष्ठ रुढी, व्यसन, तंबाखु याचा प्रतिकात्मक पुतळा व परिसरातील कचरा, तंबाखुजन्य पदार्थ गोळा करुन होळी करण्यात आली.  जिल्हा रुग्णालयात कार्यशाळानंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या सभागृहात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखुजन्य पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ.कल्पेश चव्हाण, डॉ.काळे, डॉ.सातपुते यांनी मार्गदर्शन केले. नंदुरबार येथील नवनिर्माण  संस्थेने नंदुरबार व नवापूर तालुक्यात विविध गावात जावून पर्यावरण व व्यसनमुक्त तंबाखुजन्य पदार्थांची होळी साजरा करण्याविषयी जनजागृती केली. यावेळी सतीश पाटील, इशक गावीत, शेखर पवार आदींनी परिश्रम घेतले. तसेच  शहादा तालुक्यातील कलमाडी येथील कॅन्सरग्रस्त संदीप पाटील यांनी परिसरातील विविध गावात तंबाखुमुक्त होळी साजरी केली. व मोफत व्यसनमुक्तीचे पोस्टर वाटप केल़ेजिल्हा उपनिंबधक एस. वाय. पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली नागरीकांनी नंदुरबार शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मुलांच्या वसतीगृहाच्या क्रीडांगणावर असलेल्या प्लॅस्टीक पिशव्या, पाणी बॉटल व इतर कचरा  एकत्र जमा करुन परिसर स्वच्छ केला. जमा झालेल्या कच:याची होळी केली. ‘स्पंदन’ समुहातील श्रीकांत चौधरी यांनी क्रीडांगण स्वच्छतेवर मार्गदर्शन केल़े त्यांना समुहातील पारस जैन, अनिल चौधरी, जितेंद्र गोस्वामी, सुभाष खैरनार, दिलीप चौधरी आदींनी सहकार्य केल़े या वेळी एस.वाय.पुरी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, समाज चांगल्या गोष्टींना नेहमीच पाठीबा देतो. या उपक्रमांना नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला. निसर्ग आणि मानव यांच्या द्वैतातून तयार झालेल्या प्रथा-परंपरा, प्राचीन काळापासून त्यांची सणांशी जुळलेली नाळ अशी एक पुरातन संस्कृती आपल्याकडे नांदताना दिसते. काळानुरूप त्यात अनेक बदल होत गेले. मात्र काळानुसार हे सण निसर्गापासून दूर जाऊ लागले आणि त्यांचा मूळ उद्देश मागे पडला. मात्र सण साजरे करताना सामाजिक परिस्थितीचे भान राखणे गरजेचे असल्याचे ते म्हणाल़े पर्यावरणाचे होणारे प्रदूषण आपल्याला टाळता येऊ शकते. त्यामुळे रोगराई चा प्रसारही थांबवता येऊ शकतो. स्वच्छतेचा अवलंब करुन होळी सण साजरा करुन एक नवा आर्दश निर्माण केला असल्याचेही त्यांनी सांगितल़ेकळंबू येथे नैराश्याची होळी.  कळंबू ता. शहादा गावात राष्ट्र सेवा दल शहादा व महाराष्ट्र अंधश्रध्दा निमरूलन समितीच्या  वतीने ‘नैराश्याची होळी’ करण्यात आली. याप्रसंगी परिसराची सफाई करून केरकचरा व नैराश्यातून मानव व्यसनाच्या आहारी जातो, त्या व्यसनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन या होळीच्या निमित्ताने करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ नागरीक संघाचे अॅड़ गोविंद पाटील, राष्ट्रीय सेवा दलाचे कार्याध्यक्ष माणिक चौधरी, मोहन पटेल, अंनिसचे कळंबू येथील शाखाध्यक्ष साहेबराव गायकवाड, उपाध्यक्ष युवराज बोरसे, अंनिसचे शहादा शाखा कार्याध्यक्ष रविंद्र पाटील, प्रधान सचिव संतोष महाजन, मोहन देवरे आदी मान्यवर उपस्थित होत़े याप्रसंगी माणिक चौधरी, अॅड़ गोविंद पाटील, रविंद्र पाटील आदी  मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत कुवर, योगेश बोरसे, प्रवीण वाघ, दिपक बागुल, ज्ञानेश्वर माळी, भुषण जगताप, रोहीत गवळे, स्वप्निल गवळे, प्रथमेश बोरसे, संजय महाले, सौरभ माळी, गुणवंत सोनवणे, उदय झाल्टे आदींनी परिश्रम घेतल़े