शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

टिक् टिक् वाजते डोक्यात..जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 13:04 IST

रमाकांत पाटील।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार: टिक् टिक् वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात.. कधी जुनी कधी नवी संपते अंतर ...

रमाकांत पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार: टिक् टिक् वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात.. कधी जुनी कधी नवी संपते अंतर झोक्यात.. दुनियादारी या मराठी चित्रपटातील सोनू निगम व सायली पंकज यांनी गायलेल्या या गीताच्या बोलाप्रमाणे सध्या जिल्ह्यातील सर्वच पक्षातील नेते व कार्यकत्र्याची अवस्था              झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने मूळ भाजपचे, नवीन भाजपचे कार्यकर्ते आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सर्वच पक्षातील कार्यकत्र्याना  आगामी राजकारणाची चिंता              सतावत आहे. अमूक नेता भाजपमध्ये आल्यास आपली अवस्था काय  होईल या समीकरणात सर्वच नेते         दंग झाले असून जिल्ह्याच्या राजकारणात कधी नव्हे इतकी संभ्रमावस्थेची स्थिती निर्माण झाली आहे.देशात आणि राज्यात भाजपप्रणित सत्ता आहे. लवकरच विधानसभा निवडणूक लागणार आहे. राज्यभरातून भाजपमध्ये प्रवेश करणा:यांची संख्या वाढत असल्याने इतर पक्षातील नेत्यांची अवस्था दयनीय झाली आहे. जिल्ह्यात यापेक्षा वेगळे चित्र नाही. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला अपयश आल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावीत यांचे सुपुत्र भरत गावीत यांनी भाजपची वाट धरली. त्यापाठोपाठ  आणखी काही काँग्रेसचे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यासंदर्भातील नेत्यांच्या गोपनीय भेटीगाठी देखील सुरू झाल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रमही लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत आहेत. अशा स्थितीत दुस:या फळीतील कार्यकर्ते मात्र कमालीच्या संभ्रमात आहेत. जर जिल्हा परिषदेची निवडणूक तात्काळ जाहीर झाली तर कुठल्या पक्षातर्फे उमेदवारी करावी व मागावी असा प्रश्न सर्वच इच्छुकांना आहे. कारण हे कार्यकर्ते ज्या नेत्याचे समर्थक आहेत तो नेता उद्या कुठल्या पक्षात राहील   हा प्रश्न सर्वानाच पडला आहे. नेत्यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेने आपला नेता खरोखरच पक्ष बदलेल की त्याच पक्षात राहील, पक्ष बदलला तर त्याचे स्थान काय राहील, आपण कुठल्या पक्षातर्फे निवडणूक लढवली पाहिजे, त्यासाठी उमेदवारी कोणता नेता ठरवेल, विरोधी गटाचा उमेदवार कोण राहील असे अनेक प्रश्न इच्छुकांच्या मनात आहेत. या सा:या प्रश्नांची उत्तरे आज कार्यकर्ता ज्याला नेता मानतो तो नेतादेखील देऊ शकत नाही.एकीकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुकांची ही स्थिती आहे तर दुसरीकडे पक्षीय नेत्यांची अवस्था देखील त्यापेक्षा वेगळी नाही. काँग्रेसचा अमूक वजनदार नेता भाजपमध्ये आला तर आपले अस्तित्व कुठे राहील? नेता कोण राहील? पक्ष कोणाला पद देईल? भाजपच्या जुन्या पदाधिका:यांचे आदेश पक्षात नवीन येणारे नेते व कार्यकर्ते मानणार का? अमूक नेता आल्यानंतर आपले स्थानिक वजन कमी तर होणार नाही ना? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मूळ भाजपचे नेते व कार्यकर्ते देखील शोधत आहेत. एकूणच कुठला नेता कुठे गेल्यानंतर राजकीय स्थिती काय होईल याचा अनुमान काढण्यातच सर्व व्यस्त आहेत. जो तो आपल्या अस्तित्वाचे समीकरणाची चाचपणी करीत असल्याने सर्वपक्षीय नेत्यांची व कार्यकत्र्याची अक्षरश: झोप उडाली आहे.त्यामुळे एकूणच जिल्ह्यातील सर्वच राजकारण गोंधळाचे झाले आहे. अशा स्थितीत भाजपचे नेतेदेखील आपल्या पक्ष नेतृत्वाकडे अमूक नेत्याला प्रवेश देऊ नये, अमूक नेत्याच्या येण्यामुळे पक्षात काय हानी होईल याबाबतची चर्चा सुरू केली आहे. एकमेकांचे उणेदुणे शोधण्यात नेते देखील व्यस्त झाले आहेत. कार्यकत्र्याना काय करावे असा तर नेत्यांना कुठे जावे असा प्रश्न पडला आहे. मुळातच सध्याच्या भाजपमध्ये गटबाजी आहेच त्यात नवीन इनकमिंगमुळे राजकारणाचा कसा गोंधळ होईल या चर्चेत सध्या सामान्य जनताही रंगली आहे. अशा स्थितीत येणा:या काळात भाजपचे पक्षनेते काय भूमिका घेतात, कोण पक्षांतर करणार याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.