शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

ठेंगचे शिवारात बिबटय़ाचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 11:51 IST

शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण : हिंसक प्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा

ठळक मुद्दे बिबटय़ाची जोडी असल्याचा अंदाज 4दरम्यान, परिसरात बिबटय़ाची जोडी असल्याचा अंदाज अनेकांकडून वर्तविण्यात येत आह़े यात मादी बिबटयाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आह़े दरम्यान याच परिसरात अनेकांनी बिबटय़ाची जोडी पाहिली असल्याचेही सांगण्यात येत आह़े त्यामुळे य

लोकमत ऑनलाईनदिनांक 14 ऑगस्ट कोठार : शहादा तालुक्यातील ठेंगचेतर्फे बोरद शिवारात बिबटय़ाचा थरार स्थानिकांना अनुभवायला मिळाला आह़े रविवारी अगदी गावालगत बिबटा आढळून आल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आह़ेरविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा बिबटा बोरद ते शहादा रस्त्यावरील ठेंगचे गावालगतच्या उसाच्या शेतातून निघाला व रस्ता ओलांडत दुस:या बाजूला असलेल्या कपाशीच्या शेतात गेला़ अचानक रस्त्यावरुन बिबटय़ाचे दर्शन झाल्याने रस्त्यावरील वाहनधारकांची चांगलीच भंबेरी उडाली़ काहींचा तर चांगलाच थरकाप उडाल्याने त्यांनी पुढे जाण्याचे नियोजन वगळता पुन्हा माघारी फिरणेच पसंत केल़े अचानक समोरुन बिबटा गेल्याने उपस्थित चांगलेच चकीत झाले                 होत़े प्रथम दर्शनी काहींना समोरुन कुत्रा गेल्यासारखा भास झाला़                परंतु नंतर बिबटा  कपाशीच्या             शेतात गेल्यानंतर अनेकांना तो बिबटाच असल्याची खात्री                झाली़कपाशीच्या शेतात निंदणीचे काम पूर्ण झाल्याने शेतात गवताचे प्रमाण कमी होत़े त्यामुळे रस्त्यावर असलेल्या उपस्थितांना पाहून             बिबटा कपाशीच्या झाडाच्या मागे लपण्याचा प्रयत्न करताना दिसून येत होता़सुमारे 15 मिनिटांनंतर बिबटा शेताच्या दुस:या बांदावर पोहचला़ आडोश्याच्या मागे गेल्याने बिबटय़ाला पाहणारे वाहनधारकही नंतर मार्गस्थ झाल़े मागील वर्षभरापासून शहादा तालुक्यातील परिवर्धा, त:हाडी, सोनवल, ठेंगचे, जावदेतर्फे बोरद, औरंगपूर, कुढावद आदी गावांच्या शिवारात सातत्याने बिबटय़ासह अस्वल व अन्य जंगली हिंस्त्र श्वापदांचा वावर असल्याचे आढळून आले आह़े मागील वर्षी सोनवल गावाच्या शिवारात अस्वलाने केलेल्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती़ तर तत्पूर्वी परिवर्धा-सोनवल गावांच्या शिवारात बिबटय़ांची तिन पिल्लू आढळून आली होती़ या गावाच्या शेतशिवारात सातत्याने जंगली प्राणी आढळून येत असल्याने शेतकरी व मजुरांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण असल्याचे दिसून येत आह़े वनविभागाने या प्रकाराकडे गंभीरतेने बघण्याची आवश्यकता असल्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े मागील दोन-तीन महिन्यापासून ठेंगचे गावातील अनेकांच्या बक:या बिबटय़ाने फस्त केल्याचीही माहिती ग्रामस्थांकडून मिळाली आह़े या आधीदेखील परिसरात बिबटय़ाचे दर्शन झाले असल्याने त्यामुळे येथील शेतकरी तसेच शेतमजूर बिचकतच कामे करीत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़े आता बिबटय़ाचे पुन्हा दर्शन दिले असल्याने शेतक:यांमध्ये तसेच परिसरातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आह़े दरम्यान परिसरात सातत्याने जंगली प्राणी आढळून येत असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये कमालीचे भितीचे वातावरण निर्माण झाले                आह़े याकडे वन विभागाने लक्ष देऊन बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून जोर धरु लागली   आह़े