शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर बर्निंग बसचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 21:44 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी :  धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्ग सहावर  विसरवाडी पासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी ...

 लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी :  धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्ग सहावर  विसरवाडी पासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी निमदर्डा  फाट्याजवळ धावत्या लक्झरी बस ने पेट घेतला.  चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचून त्यांना बर्निंग बसचा अनुभव आला. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला.   औरंगाबाद येथून  एम.एच. ४० ए.टी २९२९ बस नवापूर मार्गाने सुरतकडे निघाली होती. दरम्यान सोमवारी पहाटे  तीन वाजेच्या सुमारास निमदर्डा गावाच्या फाट्याजवळ आल्यावर बसमध्ये काही जळत असल्याचा वास आल्याची तक्रार एका प्रवाशाने चालक दलजीत सिंग याच्याकडे केली होती. चालक दलजीत सिंग याने मागे वळून पाहिले असता मागील बाजूस आगीच्या ज्वाळा निघत असल्याचे त्यास दिसून आले. प्रसंगावधान राखत चालकाने गाडी रस्त्यात थांबवत सर्वांना खाली उतरवून सामान काढण्याच्या सूचना केल्या. प्रवाशांनीही तातडीने बसमधून उतरुन सामान घेत सुरक्षित जागा पटकावली. यानंतर अवघ्या काही क्षणात बसने पूर्णपणे पेट घेतला होता. चालकासह प्रवाशांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतू आग आटोक्यात आली नाही. पहाटेच्या सुमारास या घटनेची माहिती विसरवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर महामार्ग मदत केंद्रावरील पोलीस कर्मचारी, विसरवाडी पोलीसांचे पथक घटनास्थळी हजर झाले होते. नवापूर येथून अग्नीशमन बंबही बोलावण्यात आला होता. परंतू बंब पोहोचेपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. दरम्यान बसमध्ये काही प्रवाशांचे सामान जळून खाक झाल्याची माहिती आहे. आगीमुळे बसचे २० लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी चालक दलजीत सिंग  यांनी दिलेल्या खबरीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात अग्नि उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कृष्णा पवार हे करीत आहेत. दरम्यान महामार्गावर सलग अपघातांची मालिका सुरू आहे. कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी ही घटना घडली आहे. गेल्या दीड महिन्यात कोंडाईबारी घाटात दोन भीषण अपघात घडले होते. त्यानंतर घडलेल्या या घटनेमुळे भिती व्यक्त होत आहे.