शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मालाची प्रत ठरवणार त्रिस्तरीय समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 11:23 IST

प्रस्ताव : नंदुरबार बाजार समितीत खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीत

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 18 : बाजार समितीत आवक होणा:या धान्याची प्रतवारी ठरवून त्याची शिफारस व्यापा:यांना केली जावी, यासाठी त्रिस्तरीय समितीची गठीत करण्यात येणार आह़े नंदुरबार बाजार समितीने याबाबत जिल्हा उपनिबंधक यांना प्रस्ताव दिला आह़े खान्देशातील बाजार समित्यांमध्ये हमीभावानुसार खरेदी करावी, कशी असा प्रश्न उपस्थित करून व्यापा:यांनी व्यवहार बंद पाडले असताना नंदुरबार बाजार समितीत मात्र खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीत सुरू आहेत़ बाजार समिती प्रशासन आणि व्यापारी यांच्या समन्वयाने ग्रेडिंग झालेल्या मालाची खरेदी विक्री करण्यावर भर दिला जात आह़े बुधवारी अक्षयतृतीया असल्याने मंगळवारी सकाळपासून बाजार समितीच्या धान्य मार्केटमध्ये किमान  50 वाहनांमध्ये गहू, ज्वारी, मका  विक्रीसाठी शेतक:यांनी आणला होता़ या मालाचे योग्य ग्रेडिंग करून व्यापा:यांकडून खरेदी करण्यात आली होती़ यामुळे शेतक:यांमध्ये निर्माण झालेली चिंता दूर झाली आह़े बाजार समितीकडून बाजार समितीत येणा:या मालाची प्रतवारी ठरवून त्याची खरेदी विक्री करण्याबाबत त्रिसदस्यीय समिती तयार करण्याबाबत सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक एस़वाय़पुरी यांना प्रस्ताव दिला आह़े या समितीत सहायक उपनिबंधक, कृषी अधिकारी आणि बाजार समिती सचिव यांचा समोवश राहणार आह़े या त्रिस्तरीय समितीकडून बाजारात दर दिवशी येणा:या शेतमालाची प्रतवारी अर्थात ग्रेडिंग करून त्याची खरेदी-विक्री करण्याची परवानगी देण्यात येणार आह़े या पद्धतीमुळे व्यापा:यांना सोयीस्कर होऊन ग्रेडिंग झालेल्या मालाची खरेदी करता येणार आह़े व्यापा:यांकडून समितीचे गठन व्हावे अशी मागणी होती़ समिती स्थापन झाल्याने संबधित अधिकारी बाजार समितीच्या लिलावांसाठी सकाळी 9 वाजेपासून उपस्थित राहतील का, असा प्रश्न असला तरी, ग्रेडींग करणा:या समितीमुळे मालाची खरेदी विक्री सुरळीत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आह़े समिती गठीत केल्याचे आदेश उपनिबंधक काढणार असल्याने त्यांच्या पुढील निर्णयाकडे व्यापा:यांचे लक्ष लागून आह़े खान्देशातील काही बाजार समित्यांमध्ये व्यापा:यांच्या बंदमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असताना नंदुरबार बाजार समितीत सुरू असलेल्या व्यवहारांमुळे शेतक:यांना मोठा दिलासा मिळाला आह़े