शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १७ एजन्सींकडून दर दिवशी पोहोचवले जाताहेत तीन हजार सिलींडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये गोरगरीबांचे हाल होवू नयेत यासाठी उज्जवला गॅस योजनेंतर्गत लाभार्थींना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये गोरगरीबांचे हाल होवू नयेत यासाठी उज्जवला गॅस योजनेंतर्गत लाभार्थींना तीन महिने मोफत गॅस सिलींडर देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे़ यांतर्गत जिल्ह्यातील १७ एजन्सीधारक टप्प्याटप्प्याने पुरवठा करत असून सोमवारपासून वाटप अधिक वेगाने सुरु होणार आहे़ तूर्तास नागरिकांना नियमितपणे दर दिवशी तीन हजार सिलींडर पोहोचत आहेत़नंदुरबार येथे पाच, नवापुर येथे दोन, शहादा पाच, तळोदा १, अक्ककुवा तालुक्यात ३ तर धडगाव येथे १ अशा एकूण १७ एजन्सींद्वारे जिल्ह्यात घरगुती स्वयंपाकासाठी लागणारे गॅस सिलींडर वाटप करण्यात येतात़ शनिवारअखेरीस सर्व १७ एजन्सींकडे १७ हजार १२१ सिलींडर असल्याची माहिती देण्यात आली आहे़ या एजन्सींकडून एकूण २ लाख २५ हजार नियमित घरगुती कनेक्शन आहेत़ तर गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातील महिलांकडून उज्ज्वला योजनेंतर्गत नोंदण्या करण्यात आल्या आहेत़ याची संख्या ही ८५ हजारांच्या घरात आहे़ हे सर्व कनेक्शन अ‍ॅक्टीव्हेट करण्यात आले आहेत़ वाटपानंतर बऱ्याच जणांनी गॅस सिलींडरचा वापर सुरु केला होता़ यातून या योजनेचे जिल्ह्यातील महत्त्व वाढले आहे़ उज्ज्वला योजनेच्या सिलींडरचा पुरवठा कंपन्यांकडून टप्प्याटप्प्याने होण्याची माहिती आहे़ यानुसार सर्वच एजन्सीने तीन महिन्यांसाठीच्या सिलींडरच्या नोंदण्या ह्या गेल्या आठवड्यापासून सुरु केल्या आहेत़ यात मोबाईल क्रमांकावर ओटीपी देण्यासह विविध कामांना सुरुवात झाली आहे़ यातून नोंदणी झालेल्या ग्राहकांना घरपोच सिलींडर देण्यावर भर देण्यात येत आहे़ येत्या आठवड्यात जास्तीत जास्त लाभार्थींपर्यंत हे सिलींडर पोहोचणार आहे़दरम्यान दुसरीकडे लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळातही नियमित ग्राहकांना घरपोच सिलींडर देणे वेगात सुरु आहे़ शनिवारअखेरीस सर्व १७ एजन्सींमध्ये ७ हजार १२१ सिलींडरचा साठा उपलब्ध होता़ यातून तीन हजार २९४ ग्राहकांपर्यंत सिलींडर पोहोचते करण्यात आले होते़ सरासरी दर दिवशी तीन हजार ग्राहकांना सिलींडर पोहोचते करण्यावर भर दिला जात असून जिल्हा पुरवठा विभाग नियमित कनेक्शनसह उज्ज्वला योजनेच्या वाटपावर लक्ष ठेवून आहे़उज्ज्वला गॅस योजनेचे सर्वाधिक कनेक्शन्स हे ग्रामीण भागात असल्याने एजन्सीधारकांकडून योग्य त्या प्रकारे नियोजन करण्यात आले आहे़ नोंदणीसाठी गर्दी होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग करुन ग्रामीण भागात नोंदण्या करुन कार्ड अपडेट करुन देण्यात आले आहेत़ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कनेक्शन असल्याने पुरवठा करण्यात अडचणी येणार नाहीत यासाठी पुरवठा कंपन्यांकडून दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़