शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धडगावात तीन दुकाने आगीत खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 15:59 IST

20 लाखांचे नुकसान : प्रशासनाकडून पंचनामे; नुकसानग्रस्तांची भरपाईची मागणी

धडगाव : मुख्य बाजारपेठेत तीन दुकानांना अचानक आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली़ आग विझविण्यासाठी नागरिकांनी शर्थीचे प्रय} केले.   पहाटेर्पयत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीचे कारण समजू शकले नाही. प्रशासनाकडून आगग्रस्त दुकानांचा पंचनामा करण्यात आला.शहरातील मुख्य  बाजारपेठेतील पाटीलबाबा चौकालगत विविध प्रकारची दुकाने आहेत.  रात्री दहाच्या सुमारास दुकानातून धुरनिघत असल्याचे नागरीकांच्या निदर्शनास आले. आग विझविण्यासाठी नागरीकांनी एकच धावपळ केली, तोर्पयत आगीने रौद्ररूप धारण करत तीन दुकाने भस्मसात केली. यामध्ये एक हॉटेल, एक प्लास्टीक ताडपत्री विक्रीचे दुकान तर एका फूटवेअर दुकानाचाही समावेश आहे. घटनास्थळी उपस्थित नागरीकांनी प्रसंगावधान राखून आपापल्या परिने शर्थीचे प्रय} करून रात्री एक वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीचे रौद्ररूप पहाता बाजारपेठेतील एकापाठोपाठ एक दुकान जळण्यास सुरुवात झाली होती. मात्र नागरीकांच्या सतर्कतेमुळे व मदतकायार्मुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. शहरात आपत्कालीन परिस्थितीत आग विझविण्यासाठी अग्निशमन बंब किंवा इतर यंत्रणा नसल्याने नागरीकांना आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेजारील बोअर, हातपंप, टँकर यांची मदत घ्यावी लागली. यावेळी आर.पी. पेट्रोलीयम या पेट्रोलपंपावरून बारा अग्निशमन सिलींडरच्या सहाय्याने आग ओटोक्यात आणण्यात यश मिळाले. आगीतील नुकसानग्रस्त दुकानांचा प्रशासनामार्फत पंचनामा करण्यात आला. यामध्ये प्लास्टीक ताडपत्री विक्रेते रवींद्र नथ्थू साठे यांचे साडेचार लाख तर दुकान मालक जालमसिंग नटवर पावरा यांचे एक लाख 80 हजार रुपये, हॉटेल व्यावसायिक लताबाई प्रकाश रामोळे यांचे चार लाख 15 हजार रुपये तर फूटवेअर दुकान मालक फीरोज युसुफ शेख यांचे सहा लक्ष रुपये तर दुकान मालक दिलवरसिंग इंद्रसिंग पावरा यांचे दोन लाख दहा हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पंचनाम्यात नोंद करण्यात आला आहे. तलाठी के.जी. पावरा, बी.यु. बडे, अमोल बोरसे, तहसील लिपीक किशोर राठोड व कोतवाल अनिता मक्राणे यांनी प्रशासनातर्फे पंचनामा केला. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती, पोलीस पाटील धनसिंग पावरा, नगरसेवक प्रल्हाद भोई, भाऊराव पाटील, लतेश मोरे यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.