शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

युवतीच्या अपहरणप्रकरणी शहाद्यातील तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 11:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील टेक भिलाटी परिसरातील 22 वर्षीय युवतीचे जबरदस्तीने पलायन  केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील टेक भिलाटी परिसरातील 22 वर्षीय युवतीचे जबरदस्तीने पलायन  केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी फरार आहे. दरम्यान, मुलीच्या नातेवाईकांनी संशयिताच्या घराची तोडफोड केली असून  त्यांच्यावर कारवाईसाठी जुन्या पोलीस स्टेशनजवळ संतप्त जमाव गोळा झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.शहरातील टेकभिलाटी परिसरात राहाणा:या 22 वर्षीय युवतीला बबलू पठाण याच्याशी लग्न करुन देण्याच्या उद्देशाने आवेश हसन पठाण, शोएब शे. अनिस शे. व परवेज शे.अनिस शे. (सर्व रा.शहादा) यांनी संगनमताने एकत्र येऊन जबरदस्तीने बबलू पठाण याच्यासोबत मोटारसायकलीवर बसवून पळवून लावले. युवतीच्या भावाच्या फिर्यादीवरून चारही आरोपींविरुद्ध अॅट्रासिटीचा  गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आवेश पठाण, शोएब शेख, परवेज शेख या तिघांना अटक केली असून मुख्य आरोपी बबलू पठाण फरार आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पी.पी. सपकाळे  करीत आहेत. दरम्यान, संतप्त मुलीच्या नातेवाईकांनी मुख्य आरोपी बबलू पठाण याच्या घराची तोडफोड केली असून  एका संशयितास चांगलेच बदडून काढले. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी शहरातील जुन्या पोलीस स्टेशनवर संतप्त नातेवाईक व कार्यकत्र्याचा मोठा जमाव जमा झाला होता. पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी फौजफाटय़ासह तात्काळ धाव घेतल्याने संभाव्य अनर्थ टळला.