शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणप्रकरणी तिघांना दंडाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतीच्या वादातून पती-प}ीसह मुलाला बेदम मारहाण करणा:या तीन संशयीत आरोपींना न्यायालयाने प्रत्येकी 500 रुपये ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतीच्या वादातून पती-प}ीसह मुलाला बेदम मारहाण करणा:या तीन संशयीत आरोपींना न्यायालयाने प्रत्येकी 500 रुपये दंड व जखमींना प्रत्येकी हजार रुपये देण्याचे आदेश दिले. अक्कलकुवा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी हे आदेश बुधवारी दिले.या खटल्याची संक्षीप्त हकीकत अशी : मोवानचा पाटीलपाडा, ता.अक्कलकुवा येथील मोगराबाई तिरसिंग वसावे हे त्यांचा पती तिरसिंग व मुलगा मानसिंग वसावे  यांच्यासोबत राहतात. दमण्या वसावे यांच्यासोबत त्याचा शेतीवरून वाद होता. 31 ऑगस्ट 2016 रोजी त्यांच्यात वाद होऊन दमण्या दौल्या वसावे, लिलाबाई दमण्या वसावे, गणेश दमण्या वसावे, सुरेश पारता वसावे हे लाठय़ा काठय़ा घेवून तिरसिंग वसावे यांच्या घरी गेले. तेंव्हा मोगराबाई ही समजविण्यासाठी गेली असता तिला मारहाण करण्यात आली. तिला सोडविण्यासाठी तिरसिंग व मानसिंग गेले असता त्यांनाही चौघांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर गावक:यांनी तिघांची सुटका केली. शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी या चौघांनी दिल्याची फिर्याद मोगराबाई वसावे यांनी दिली होती. मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार सुनील बागुल यांनी न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले.  न्या.करभाजन यांनी साक्षीपुरावे लक्षात घेवून मयत दमण्या वसावे याला वगळता लिलाबाई दमण्या वसावे, गणेश दमण्या सावे, सुरेश पारता वसावे यांना दोषी धरून प्रत्येकी 500 रुपये दंड व जखमींना प्रत्येकी हजार रुपये देण्याचा आदेश दिला. सरकार पक्षातर्फे अॅड.अजय सुरळकर यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सतीदान राऊळ होते.दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य संशयीत आरोपी दमण्या दौल्या वसावे हे खटला सुरू असतांनाच्या काळात मयत झाले होते.