शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गोगापूर येथे एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 12:18 IST

गोगापूरला खळबळ : बंद घराची संधी साधत चोरटय़ांनी मारला हात

ब्राम्हणपुरी : शहादा तालुक्यातील गोगापूर येथे एकाच रात्री तीन ठिकाणी घर फोडी झाली. चोरटय़ांनी दोन तोळे सोने व 10 हजाराची रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.शहादा तालुक्यातील गोगापूर येथे गुरुवारी रात्री तीन घरफोडय़ा झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडीस आली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोगापूर येथील आशाबाई प्रल्हाद पाटील या आपल्या घराला कुलूप लावून आपल्या मुलीकडे नंदुरबार येथे गेलेल्या होत्या याची संधीचा फायदा घेऊन गुरुवारी रात्री चोरट्यानी घराचे कुलूप कापून हात साफ केले. यावेळी घरातील लोखंडी कपाट उघडून सर्व कपडे व सामान फेकून दिले. कपाटातील दोन तोळे सोने, दहा हजार रुपये रोख रक्कम चोरून पोबारा केला. या घरासमोरीलच जाधव कानजी पाटील यांचा बंद घराचे कुलूप त्याच पद्धतीने  कापले. घरमालक तीन दिवसापूर्वी दमन येथे गेले असल्याने चोरांनी काय लंपास केले कळू शकले नाही. त्याच गल्लीतील हाकेच्या अंतरावरील मायाबाई रमण पाटील ह्या गेल्या महिनाभरापासून अमेरिकेत आपल्या मुलीकडे गेल्या आहेत. चोरट्यानी लोखंडी गेटचे कुलूप त्याच पद्धतीने कापून घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तेथूनही चोरी करण्यात आली. परंतु घर मालक गेल्या महिनाभरापासून अमेरिका येथे गेलेले असल्यामुळे चोरट्यांनी काय चोरून नेले याबाबत समजू शकले नाही.शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीस वर्षा नंतर घटना गोगापूर येथे 1976 साली सुरेश सजन पाटील यांच्या घरी धाडसी घर फोडीत 20 तोळे सोने व रोकड लंपास झाल्याची घटना घडली होती. 40 वर्षा नंतर गोगापूर येथे धाडसी चोरीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.