शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गणोर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीनजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 11:19 IST

गणोर शिवार : वनविभागाकडून उपाययोजना, भितीचे वातावरण

म्हसावद : गणोर शिवारात बुधवारी बिबट्याने स्थानिक शेतकऱ्यांवर दोनदा हल्ला केला. या हल्यात तीन जण जखमी झाले असून, त्यांना म्हसावद ग्रामीण रुग्णालयातून नंदुरबार येथे हलविण्यात आले आहे.याबाबत असे की, अंबापूर-गणोर शिवारात एक ते दीड महिन्यापासून बिबट्याची दहशत आहे. दरम्यान बुधवारी सकाळी नऊ वाजता आडगाव येथील कैलास यासींग ठाकरे (४०) हा शेतात शेळ्या चारत असतांना बिबट्याने अचानक हल्ला केला. मात्र प्रतिरोध केल्याने पळण्यात यशस्वी झाला. गावात येवून संगितल्याने गावातील लोक लाढ्या-काठ्या घेवून शेतात बिबट्याच्या शोधार्थ गेले. त्या वेळी साडे दहा वाजता बिबट्याने दिलवरसिंग बजरंग निकुंभ (३४) रा.गणोर, अनिल विजय रावताळे (२१) रा.आडगाव यांच्यावर हल्ला करून जमखी केले.सद्य:स्थितीत बन्सीलाल सजन भामरे रा. गणोर, यांच्या गव्हाच्या शेतात बिबट्याने आश्रय घेतला आहे. या भागात दोन पिंजरे, पाच सी.सी.टीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, दिवसा २५ कर्मचारी, रात्री २५ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.घटना स्थळी वनसंरक्षक एस.बी. केवटे, सहायक वनसंरक्षक एस.आर. चौधरी यांनी भेट दिली असून, वनक्षेत्रपाल एस.के. खुणे, पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनराज निळे, पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देवून पंचनामा केला. वनपाल बी.के. थोरात, आर.जी. लामगे, पी.आर. नीळे, व्ही.ए. भदाणे, वनरक्षक, वनकर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.यामुळे शेतकरी, शेतमजूर यांच्यात भितीचे वातावरण आहे.