शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या आठ दुचाकीसह तीन जण एलसीबीच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोटरसायकल चोरी करणारे व चोरीची मोटरसायकल घेणारे अशा तीन जणांना स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मोटरसायकल चोरी करणारे व चोरीची मोटरसायकल घेणारे अशा तीन जणांना स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलीस कर्मचा:यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.तुषार शालीग्राम कोळी रा.म्हळसरे, ता.शिंदखेडा, सागर उर्फ भाईजी संतोष सावळे, जितेंद्र कैलास पाटील, रा.मोरतलाई, ता.पानसेमल असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यात मोटरसायकली चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेकडून तपास सुरू होता. अशातच एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांना गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी खेडदिगर, ता.शहादा येथे पाळत ठेवली असता खेडदिगर बस स्थानक आवारात एकजण मोटरसायकलवर संशयीतरित्या फिरतांना दिसला. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे कागदपत्रे नव्हती. नंतर त्याने चोरीची मोटरसायकल असल्याचे सांगितले. पोलीसी खाक्या दाखवताच त्याने नरडाना, शिरपूर, धुळे तसेच सुरत येथून सहा मोटरसायकली चोरी करून मध्य प्रदेशात बडवाणी जिल्ह्यातील पानसेमल तालुक्यात विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार पानसेमल तालुक्यातील मोरतलाई गावातील सागर उर्फ भाईजी संतोष सावळे याच्या ताब्यातून चार महागडय़ा दुचाकी जप्त केल्या. जितेंद्र कैलास पाटील याच्या ताब्यातून दोन दुचाकी जप्त केल्या. तसेच  तुषार शालीग्राम कोळी याने 15 मे रोजी चोरी केलेली दुचाकी पेट्रोल संपल्याने फेकून दिली होती. ती उपनगर पोलिसात जमा करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने एकुण दोन लाख 40 हजार रुपये किंमतीच्या आठ दुचाकी ताब्यात घेतल्या. शिवाय तुषार कोळी, सागर सावळे, जितेंद्र पाटील यांना अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, हवालदार जगदीश पवार, प्रदीप राजपूत, विनोद जाधव, विकास अजगे, राहुल भामरे, किरण मोरे, अविनाश चव्हाण, सतिष घुले, तुषार पाटील यांच्या पथकाने केली.