शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तीन पायांचे सरकार फार काळ धावणे शक्यच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव/बोरद : सातबारा कोरा करण्याच्या वल्गना करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले आहे. अवकाळीग्रस्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव/बोरद : सातबारा कोरा करण्याच्या वल्गना करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले आहे. अवकाळीग्रस्त शेतकºयांना कर्जमुक्तीपासून दूर ठेवण्याचे पाप हे सरकार करीत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी धडगाव व बोरद, ता. तळोदा येथील जाहीर प्रचार सभेत बोलतांना केले.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या धडगाव व बोरद, ता.तळोदा येथे सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार राजेश पाडवी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले, भाजप सरकारच्या काळात शेतकºयांना पारदर्शकपणे कर्जमाफी दिली होती. त्याचा लाभ शेतकºयांना मोठ्या प्रमाणावर झाला. शेतकºयांना कर्जमुक्ती देवून सातबारा कोरा करणार, अशा खोट्या वल्गना केल्या. या उलट पुरवणी बजेटमध्ये एकही दमडीची तरतूद केली नाही. जिल्ह्यातील आदिवासी जनतेला सव्वा लाख घरे दिली आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत सडके बनविलीत, १८ हजार गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. नामांकीत शाळांमध्ये ५० हजार आदिवासी मुले चांगले शिक्षण घेत आहे. आदिवासी शेतकºयांना वनपट्टे देऊन सिंचन सुविधा दिली असल्याचे सांगून अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाची मुदत २०२० मध्ये संपत असतांना त्याआधीच त्यावर कायदा करून ते कायम केले. साहजिकच भाजपाचा या वाढता जनाधारामुळे विरोधक हतबल झाले. परिणामी भाजपाला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी तीन पक्षांची संधी साधू महाविकास आघाडी राज्यात सत्तारूढ झाल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचलन डॉ.शशिकांत वाणी यांनी केले.माजी जिल्हा प्रमुख नागेश पाडवी, सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, धडगाव तालुकाध्यक्ष शिवाजी पराडके, सुनील पाटील, राजेंद्रकुमार गावीत, नगराध्यक्ष अजय परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राजपूत, शेतकरी आघाडीचे प्रमुख प्रविणसिंग राजपूत उपस्थित होते.जिल्ह्यातील नेते व आमदार फडणवीस यांच्यात जिल्ह्यातील गट व गणातील लढतींवर चर्चा होेऊन रणनिती आखली गेली. भाजपचीच सत्ता येईल या दृष्टीने नियोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी स्थानिक नेत्यांनी दिली. आमदार देवेंद्र फडणवीस यांनी देखील आवश्यक त्या सुचना यावेळी नेत्यांना दिल्या.