शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

एकाच वसाहतीत तीन घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील पंचशील कॉलनीत चोरांनी धुमाकूळ घालून तीन धाडसी  घरफोडी केल्या. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरटय़ांच्या हाती ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील पंचशील कॉलनीत चोरांनी धुमाकूळ घालून तीन धाडसी  घरफोडी केल्या. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरटय़ांच्या हाती किरकोळ रक्कम व वस्तूंशिवाय काहीच लागले नाही. याबाबत शहादा पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे  पंचशील कॉलनीत धनत्रयोदशीच्या दिवशी रात्रीच्या सुमारास पाच ते आठ जणांनी बंद घराची कुलपे तोडून व आजूबाजूच्या घरमालकांच्या घराच्या कडीकोयंडा लावून धाडसी चोरी केली. चोरांचा मागोवा आजूबाजूच्या घरमालकांना लागल्याने मोबाईल संपर्काने एकमेकांशी संपर्क साधून चोरटय़ांना पळवून लावले. चोरटय़ांनी सुमारे अर्धा तास धुमाकूळ घातला होता.  या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत पोलिसांना पाचारण करून घटनेची इत्यंभूत माहिती दिली. पोलिसांनी तिन्ही घरांची तपासणी करून ठसे तज्ञ व श्वानपथक यांना पाचारण करून घटनेचा मागोवा घेतला. मात्र तज्ञांच्या  पथकाला हाती काहीच लागले नाही.  त्यांना खाली हात परत जावे लागले. ही घरफोडी केंद्रप्रमुख नरेंद्र महिरे  यांचे भाडेकरू ग्रामसेवक प्रवीण खाडे हे दिवाळीच्या सुटीनिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घराला लागून असलेले पीतांबर बैसाणे व सुबोध बैसाणे यांच्या घराचे कडीकोंयडा व कुलपे लावल्याचे दिसल्याने चोरटय़ांनी तिन्ही घरांवर डल्ला मारला. मात्र त्यांना हाती काहीच लागले नाही. किरकोळ रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. याबाबत शहादा पोलिसात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.