शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

तीन आरोग्य केंद्रांना उद्घाटनाची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 12:07 IST

नंदुरबार : जिल्हा परिषदेने 15 कोटी रूपयांचा निधी उभारून तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम पूर्ण केले आह़े बांधकामानंतर ते कार्यान्वित होणे रास्त असताना विद्युतीकरण नसल्याने या वास्तू पडून आहेत़ विद्युतीकरणासाठी बांधकाम विभागाने राज्यस्तरावर दिलेला प्रस्तावही मान्य झालेला नसल्याने या केंद्रांना उद्घाटनाची प्रतिक्षा आह़े 2016-17 या आर्थिक वर्षापासून धुळीपाडा ता़ नवापूर, पिंपळखुटा ...

नंदुरबार : जिल्हा परिषदेने 15 कोटी रूपयांचा निधी उभारून तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम पूर्ण केले आह़े बांधकामानंतर ते कार्यान्वित होणे रास्त असताना विद्युतीकरण नसल्याने या वास्तू पडून आहेत़ विद्युतीकरणासाठी बांधकाम विभागाने राज्यस्तरावर दिलेला प्रस्तावही मान्य झालेला नसल्याने या केंद्रांना उद्घाटनाची प्रतिक्षा आह़े 2016-17 या आर्थिक वर्षापासून धुळीपाडा ता़ नवापूर, पिंपळखुटा आणि वेली ता़ अक्कलकुवा या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजूरी देण्यात येऊन सर्वसाधारण पाच कोटी रूपयांप्रमाणे 15 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला होता़ यात इमारतीत विद्युतीकरण करण्याच्या कामासाठी निधी मंजूर होता़ हा निधी बांधकाम विभागाच्या पुणे आणि नाशिक येथील वरिष्ठ कार्यालयांनी निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर खर्च करण्याचे सूचित केले होत़े परंतू गेल्या वर्षापासून बांधकाम विभागाने नाशिक आणि पुणे येथील बांधकाम विभागाच्या ईलेक्ट्रीकल विभागाकडे देऊनही त्यांनी प्रस्तावांना मंजूरी दिलेली नाही़ परिणामी चांगल्या दर्जाच्या वास्तू पडून आहेत़ ज्या हेतूसाठी या इमारतींची उभारणी करण्यात आली आह़े यातून आरोग्यसेवेचा हेतूही साध्य होऊ शकलेला नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आह़े विशेष बाब म्हणजे याबाबत जिल्हा परिषदेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत विस्तृत चर्चा होऊनही हा विषय मार्गी लागलेला नाही़ मिळालेल्या माहितीनुसार निविदा प्रक्रिया येत्या मार्च 2019 नंतर पूर्ण होणार असून आणखी या तीन इमारतींसोबत मोदलपाडा ता़ तळोदा वाण्याविहिर, आणि वडफळी ता़ अक्कलकुवा आणि पुरूषोत्तमनगर ता़ शहादा  या आरोग्य केंद्रांच्या नूतन इमारती 2020 मध्ये रूग्णसेवा देण्यासाठी खुल्या होणार असल्याचे वृत्त आह़े धुळीपाडा, वेली आणि पिंपळखुटा या तीन आरोग्य केंद्रांच्या बांधकामासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीतच पाच ते सहा लाख रूपयांची तरतूद होती़ या रकमेतून विद्युतीकरणासाठी लागणारा  प्रस्तावित कारवाईची सव्वा टक्का रक्कम जिल्हा परिषद बांधकाम विभागाने भरून देत प्रस्ताव पुणे येथील कार्यालयाकडे दिला आह़े यावर अद्याप कारवाई झालेली नाही़ एकीकडे वरील तीन आरोग्य केंद्राचे विद्युतीकरणाचे प्रस्ताव दिले गेले असले तरी बांधकाम सुरू असलेल्या काकर्दे, राजबर्डी, झापी ता़ धडगाव व भालेर ता  या आरोग्य केंद्रांच्या बांधकामांच्या विद्युतीकरणाच्या कामांचे प्रस्तावही टांगणीला आहेत़ सामान्यरित्या बांधकाम होत असतानाच त्यात विज पुरवठा करण्यासाठी सोय केली जात़े परंतू या सर्व आरोग्य केंद्रांपैकी केवळ वेली येथेच काहीअंशी सोय आह़े उर्वरित ठिकाणी निविदा मंजूर झाल्यानंतर पुन्हा तोडफोड करूनच विद्युतीकरणाचे काम सुरू होईल़ यातून चांगल्या वास्तूंची पुन्हा धूळधाण होण्याची शक्यता आह़े वडफळी, मोदलपाडा, वाण्याविहिर या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकामही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली आह़े परंतू तेथील विद्युतीकरणाच्या कामाबाबतही उदासिनता आह़े बांधकाम पूर्ण झाल्यानंतर यांचे उद्घाटन थेट 2020 मध्येच होण्याची शक्यता आह़े