लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऑक्टोबर महिन्यात अवकाळीमुळे बाधित झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 30 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आह़े या प्रस्तावानुसार जिल्ह्यात 6 हजार हेक्टर पिकांचे केवळ 33 टक्क्यांच्या नुकसान झाल्याने पंचनाम्यानुसार भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आह़े जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात वेळोवेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती़ यातून शेतीपिकांचे नुकसान झाले होत़े या पिकांचे पंचनामे कृषी आणि महसूल विभागाने केले होत़े या पंचनाम्यांचा अहवाल नुकसान जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आह़े पंचनाम्यांनुसार जिल्ह्यात 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांना भरपाई देणे प्रस्तावित असून कोरड आणि बागायत क्षेत्रातील 10 हजार शेतकरी या भरपाईला पात्र ठरणार आहेत़ सर्व सहा तालुक्यात नुकसान झाल्याच्या शेतक:यांच्या दाव्याला या अहवालातून पुष्टी मिळत असून सर्वाधिक नुकसान धडगा, शहादा आणि अक्कलकुवा तालुक्यात झाल्याची माहिती देण्यात आली आह़े शासनाकडे देण्यात आलेल्या या प्रस्तावानंतर भरपाई देण्याची पुढील कारवाई नेमकी कशी होणार याकडे शेतक:यांसह जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आह़े नंदुरबार तालुक्यात एकूण 55़57 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आह़े यातून 78 शेतक:यांना 5 लाख रुपयांची मदत प्रस्तावित आह़े कोरड क्षेत्रात 52 तर फळपीक धारक 27 शेतक:यांचा समावेश आह़े नवापुर तालुक्यात 1 हजार 593 शेतक:यांच्या 506़25 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आह़े यासाठी 34़58 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आह़े 1 हजार 589 शेतकरी हे कोरडवाहू क्षेत्रधारक तर 4 शेतकरी फळपिकधारक आहेत़ अक्कलकुवा तालुक्यात तब्बल 1 हजार 869 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आह़े 3 हजार 965 शेतक:यांना अवकाळीचा फटका बसल्याने त्यांना 1 कोटी 27 लाख 28 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यात आली आह़े शहादा तालुक्यात 2 हजार 68 शेतक:यांच्या 1 हजार 576 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आह़े या शेतक:यांसाठी 1 कोटी 4 लाख रुपयांची मदत प्रस्तावित करण्यात आली आह़े तालुक्यात 2 हजार 58 कोरडवाहू शेतक:यांचे नुकसान झाले आह़े धडगाव तालुक्यात 3 हजार 173 शेतक:यांना अवकाळीचा फटका बसला आह़े यातून 1 हजार 857 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आह़े या शेतक:यांसाठी 1 कोटी 26 लाख 36 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आह़े तळोदा तालुक्यात 8 शेतक:यांच्या 4 हेक्टरचे नुकसान झाले आह़े जिल्ह्यात आजघडीस तब्बल 10 हजार 885 शेतक:यांच्या 5 हजार 818 हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचे पूर्ण झालेल्या पंचनाम्यातून स्पष्ट करण्यात आले आह़े यात 5 हजार 788 हेक्टर हे कोरडवाहू क्षेत्र आह़े तर 22 हेक्टर क्षेत्र हे बागायती आह़े या संपूर्ण नुकसानीसाठी शासनाकडे 3 कोटी 8 लाख 23 हजार रुपयांच्या भरपाईचा प्रस्ताव देण्यात आला आह़े मोठा गाजावाजा करत प्रशासनाकडून अवकाळीचे पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर समाधान व्यक्त होत असले तरी नंदुरबार तालुक्यात खरीप नुकसानीची स्थिती आणि पंचनाम्यांची आकडेवारी यात तफावत असल्याचे मत शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े तळोदा तालुक्यातही दीड हजार हेक्टरच्या जवळपास पिकांना बाधा पोहोचूनही बोटावर मोजण्याएवढेच पंचनामे पूर्ण करत अहवाल दिल्याने नाराजी व्यक्त होत आह़े ही मदत नेमकी कधी मिळेल याकडे लक्ष लागून आह़े
अवकाळीतील नुकसानीसाठी शासनाकडे तीन कोटींचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:35 IST