शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
7
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
8
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
9
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
10
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
11
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
12
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
13
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
14
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
15
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
16
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
17
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
18
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
19
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
20
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश

नंदुरबार नगर पालिकेला तीन कोटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मार्चअखेर किमान ८० टक्के मालमत्ता कराची वसुली करणाऱ्या नंदुरबार नगरपालिकेला कोरोनामुळे पाळण्यात आलेल्या लॉकडाऊनचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मार्चअखेर किमान ८० टक्के मालमत्ता कराची वसुली करणाऱ्या नंदुरबार नगरपालिकेला कोरोनामुळे पाळण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे़ यातून २०१९-२० या आर्थिक वर्षात पालिकेच्या वसुलीत तीन कोटी रूपयांची घट आली असून कोरोनामुळे नवीन आर्थिक वर्षातही कर भरणा करण्यास नागरिकांचा अल्प प्रतिसाद आहे़राज्यभरात विकासकामे आणि वसुली यांचा समन्वय साधत ‘अ’ दर्जा मिळालेल्या नंदुरबार नगरपालिकेची वसुली मार्च अखेरपर्यंत ही किमान ११ ते १३ कोटींच्या घरात असते़ परंतु २०१९-२०२० हे आर्थिक वर्ष संपत असतानाच लॉकडाऊन सुरू झाल्याने पालिकेकडे गोळा होणारा हा महसूल थांबला होता़ यातून पालिकेच्या गोळा-बेरीजमध्ये मोठा फरक पडला आहे़ साधारण १३ प्रभाग असलेल्या नंदुरबार नगरपालिका क्षेत्रांतर्गत ३२ हजार मालमत्ताधारक विविध कराचा भरणा करतात़ यात पाणीपट्टी, घरपट्टी, बखळ प्लॉटचा कर यांचा समावेश असतो़ पालिका हद्दीतील शासकीय कार्यालयांच्या इमारतींचा करही पालिकेत जमा करण्यात येतो़ परंतु गत तीन महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे पालिकेत होणाºया विविध करांचा भरणा थांबला आहे़ प्रशासनाने पालिका इमारतीतच भरणा करण्याची व्यवस्था केली असली तरी याठिकाणी नागरिक फिरकत नसल्याचे दिसून आले आहे़ गेल्या वर्षात थकीत रकमेची वसुली करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना नव्याने सुरूवात करावी लागणार आहे़दरम्यान वसुली विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोना सर्वेक्षण व इतर कामांची जबाबदारी देण्यात आल्याने या करांची वसुली रखडली असल्याचेही सांगण्यात आले आहे़कर्मचारी वसुलीसाठी प्रयत्नशीललॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी पालिका वसुली विभागाने १३ प्रभागात थकबाकीदारांना नोटीसा देत नळ कनेक्शन कापणे व जप्ती करण्याचे सूचीत केले होते़ मात्र कोरोनामुळे नोटींसावर पुढे कारवाई होवू शकली नाही़ वसुली विभागाने विविध दूरसंचार कंपन्यांच्या टॉवरचा कर वसुलीसाठी प्रयत्न चालवला आहे़ यातील काही कंपन्यांकडून भरणा करण्यात आल्याची माहिती आहे़३२ हजार मालमत्ताधारक1 नगरपालिका हद्दीत ३२ हजार ३९६ मालमत्ताधारक आहेत २०१९-२०२० या आर्थिक वर्षात या मालमत्ताधारकांकडून ९ कोटी ९६ लाख ७७ हजार रूपयांची वसुली झाली आहे़ ही वसुली मार्च फेब्रुवारी २०२०च्या अखेरपर्यंतची आहे़ कोरोना महामारीला सुरूवात झाल्यानंतर पालिकेत कर भरणा करण्यासाठी येणाºयांची संख्या कमी होवून तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे़2 लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर काही काळ बंद असलेला कर भरणा एप्रिलमध्ये सुरू झाला होता़ यातून या महिन्यात ५७ हजार ७८३ रुपयांची वसुली होवू शकली़ मे महिन्यात ४ लाख ९६ हजार तर जून महिन्यात १६ लाख ४१ हजार ९४७ रूपयांचा भरणा करण्यात आला आहे़3 पालिकेकडून बिल दिल्याच्या एक महिन्याच्या आत कर भरणाºयांना १० टक्के, दोन महिन्याच्या आत भरणाºयांना आठ तर तीन महिन्याच्या आत कर भरणाºयांना पाच टक्के सूट देण्यात येते़ यामुळे शहरातील अनेक जण तातडीने कर भरणा करण्यावरही भर देतात़कोरोनामुळे कर्मचारी सध्या आरोग्य विभागाच्या मदतीला आहेत़ कोरोनाचा संसर्ग कमी होवून जनजीवन पूर्वपदावर येऊ लागल्यानंतर वसुलीसाठी नियोजन करणार आहे़ अद्यापही यावर चर्चा सुरू असून लवकरच वसुलीत वाढ करण्यासाठी प्रयत्नशील राहू़-राहुल वाघ, प्रभारी मुख्याधिकारी,नगरपालिका, नंदुरबारनंदुरबार पालिकेडून येत्या दोन महिन्यात मोहिम सुरू करुन वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती आहे़