शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदीविना पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील साडेपाच हजार शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. परंतु पावसाळा तोंडावर आलेला असतांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील साडेपाच हजार शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. परंतु पावसाळा तोंडावर आलेला असतांना साडेतीन हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे म्हणजे तारेवरची कसरत राहणार आहे. ही बाब लक्षात घेता कापूस उत्पादक शेतकºयांच्या कापसाची तपासणी जागेवर जावून करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. यामुळे शेतकºयांच्या जिवात जीव आला आहे.जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केलेल्या शेतकºयांकडे प्रत्यक्षात विक्रीसाठी शिल्लक कापसाची माहिती घेण्यासाठी नोंदणीकृत कापूस उत्पादक शेतकºयांकडे प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी व पंचनामा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी यंत्रणेला दिले आहेत.शासनाने २४ एप्रिल पासून राज्यात कापूस खरेदीस पुन्हा प्रारंभ केला आहे. जिल्ह्यातील शेतकºयांकडे कापूस विक्रीसाठी शिल्लक आहे. २६ मे अखेर नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार ५४८ कापूस उत्पादक शेतकºयांनी कापूस विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केली आहे. २ हजार २०१ शेतकºयांनी त्यांच्याकडील कापसाची विक्री केली. विविध कारणामुळे जिल्ह्यातील ३ हजार ३४७ नोंदणीकृत शेतकºयांचा कापूस विक्री होणे बाकी आहे. राज्यात कापूस खरेदीचे बाजार मुल्य दर व शासनाचे हमीभाव दर यामध्ये तफावत आहे. कापूस खरेदीचे शासनाचे हमीदर हे बाजारातील दरापेक्षा जास्त असल्यामुळे जिल्ह्यातील काही व्यापारी हे शेतकºयांच्या माध्यमातून कापूस विक्री करण्याची शक्यता आहे. तसेच लवकर पावसाळ्यास सुरूवात होणार असून जिल्ह्यातील नोंदणीकृत कापूस उत्पादक शेतकºयांकडे विक्रीसाठी शिल्लक कापसाची आकडेवारी जाणून घेण्यासाठी शेतकºयांच्या गावनिहाय याद्या तयार करण्याचे आदेश सहायक निबंधक, सहकारी संस्था यांना देण्यात आले आहेत.पथकाची नेमणूकशेतकºयाकडील शिल्लक कापसाची माहिती संकलनासाठी तहसिलदारामार्फत नियोजन करण्यात येणार आहे. तलाठी,ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी त्यांना नेमून दिलेल्या गावनिहाय याद्या प्राप्त झाल्यानंतर दोन दिवसात प्रत्यक्ष जागेवर जाऊन संबधीत शेतकºयाच्या सातबारा उताºयावरील कापूस पिकाखाली एकूण क्षेत्राची आणि शिल्लक कापसाची खात्री करण्यासाठी कापूस साठ्याचे शेतकºयासह फोटो घ्यावेत. ही प्रक्रीया दोन दिवसात पूर्ण करावी. गाव निहाय तपासणी पंचनामा झालेल्या यादीपैकी प्रत्येकी १० टक्के याद्यांची फेरतपासणी संबधीत तालुक्यातील तहसिलदार, गट विकास अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांनी केल्यानंतर गावानिहाय याद्या संबधित तहसिलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सहायक निबंधक यांच्या ताब्यात पुढील कार्यवाहीसाठी देणे आवश्यक आहे.

सहायक निबंधक, सहकारी संस्था यांनी तपासणी झालेल्या यादीप्रमाणे संबंधित कृषी उत्पन्न बाजारसमितीमार्फत यादीत नमूद शेतकऱ्यांचा कापूस प्राथम्याने खरेदी केला जाईल. यामुळे शेतकऱ्यांच्या नावाखाली खाजगी व्यापाºयांनी खरेदी केलेला कापूस बाजार समितीत विक्रीसाठी येणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी त्यांचेकडील नोंदणीकृत शेतकºयांची कापूस खरेदी प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वाप्रमाणे करण्यात येईल. याबाबत शेतकºयाची कोणतीही तक्रार येणार नाही यासाठी सहायक निबंधकानी उपाययोजना करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.