शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

हजारो दिव्यांनी उजाळले मोरवड, गुलाम महाराजांच्या स्मरणासाठी मोरवडला भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 13:01 IST

आरती पूजन कार्यक्रम

ठळक मुद्देशौचालय बांधून त्याचा वापर करण्याचे आवाहनमहिलांनी हातात आरती घेवून समाधी स्थळार्पयत गेले

गुलाबसिंग गिरासे/ऑनलाईन लोकमत

बोरद, जि. नंदुरबार, दि. 22- मोरवड, ता.तळोदा येथे आपमुळ धर्म सतीपती आरती पूजनाचा धार्मिक उपक्रम गुरूवारी मोठय़ा उत्साहात पार पाडला. या वेळी लक्ष्मण महाराज व चंद्रसेन महाराजांनी भाविकांना व्यसनमुक्तीचा संदेश देत शासनाच्या शौचालय बांधकामा करीता येणा:या शासकीय निधीतून शौचालय बांधून त्याचा वापर करण्याचे आवाहन ही केले.या वेळी माजीमंत्री तथा आमदार विजयकुमार गावीत, माजीमंत्री अॅड.पद्माकर वळवी, जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक संजय पाटील, प्रांताधिकारी विनय गोवडा, डॉ.भरत वळवी, डॉ.कांतीलाल टाटीया, रूपसिंग पाडवी, ङोलसिंग पावरा, हिरामण पाडवी, वीरेंद्र वळवी, किसन  महाराज, प्रकाश ठाकरे, डॉ.गजानन डांगे, सत्यवान पाडवी, पोलीस उपनिरीक्षक भदाणे आदी उपस्थित होते.कार्यक्रमात आमदार डॉ.गावीत यांनी सांगितले की, जिल्ह्यातील मोरवड उर्फ रंजनपूर हे गाव संत गुलाम महाराज व संत रामदास महाराजांपासून क्रांतीकारी गाव आहे. या गावातून ब्रिटिशांविरूद्ध लढेही लढले गेले होते. आदिवासी समाजात ख:या अर्थाने जनजागृतीचे काम गुलाम महाराज यांनी केले. त्यामुळे आप चळवळ जिल्ह्यात रूजली. ही चळवळ मजबूत झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले. अॅड.पद्माकर वळवी यांनी मोरवड गावाची शासनाने दखल घेवून त्यास पर्यटन स्थळ जाहीर करून पालकमंत्री तथा पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांनी विकास कामासाठी तीन ते चार कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी मोरवड गावाच्या विकासाकरीता जिल्हा नियोजन समिती व शासनाकडे निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या वेळी पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.दरम्यान दिवसभर भजन-कीर्तन सादर करून रात्री नऊ वाजता चंद्रसेन बाबांच्या घरापासून संत गुलाम महाराज व संत रामदास महाराज आणि माता दगू यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिलांनी हातात आरती घेवून समाधी स्थळार्पयत गेले. या कार्यक्रमास महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेशातील भाविकांनी मोठय़ा प्रमाणात हजेरी लावली. समाधी स्थळावर मिरवणूक पोहोचल्यानंतर आरती करण्यात आली. आरती पूजनाच्या कार्यक्रमास सहभागी होण्याकरीता पायी येणा:या भाविकांसाठी मोड, बोरद, सोमावल, मोदलपाडा व प्रतापपूर येथील ग्रामस्थांकडून अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी तळोदा पंचायत समितीेचे माजी सभापती व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाडवी, मोरवड सरपंच प्रविण वळवी, नारायण ठाकरे यांनी परिश्रम घेतले.