शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हातोडा पुलाजवळ चोरटय़ांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 11:33 IST

मोटारसायकल स्वारास लुटले : पोलीस चौकी उभारण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तळोद्याहून नंदुरबारकडे जाणा:या मोटारसायकल स्वारांची मोटारसायकल अडवून त्यांच्याकडील मोबाईल व एक हजार 700 रुपये काढून घेत त्यास चोरटय़ांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री हातोडा पुलानजीक घडली. या व्यक्तीने आपल्या मित्रांना ही घटना सांगितल्यानंतर जमाव तेथे आला परंतु तोपावेतो हे चोरटे पसार झाले होते. दरम्यान निझर व तळोदा पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू केल्याचा दावा केला असला तरी त्यानंतर लगेच पुन्हा रस्ता लुटीच्या घटना घडल्याने पोलिसांच्या कामगिरीबाबत प्रश्न उपस्थित  केला जात आहे. या रस्त्यावरील वाढती रहदारी लक्षात घेवून जिल्हा पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी चौकी उभारण्याची मागणी होत       आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तळोद्याहून एक मोटारसायकलस्वार सोमवारी रात्री हातोडा पूल मार्गे नंदुरबारकडे जात होता. त्याचवेळी पुलाच्यापुढे वळणावर दबाधरून बसलेल्या चोरटय़ांनी त्याची मोटारसायकल रस्त्यात अडवून त्याच्या जवळील मोबाईल हिसकावून खिशातील एक हजार 700 रुपये देखील बळजबरीने काढून घेतले. एवढय़ावरच ते थांबले नाही. या युवकाने प्रतिकार केल्यावर त्यास चांगलीच मारहाण केली. घाबलेल्या या युवकांनी आपल्यावरील प्रसंगाची माहिती गावातील मित्रांना सांगितल्यावर 25 ते 30 तरूण मोटारसायकलीने येवून घटनास्थळी दाखल झाले. तो  पावेतो चोरटे तेथून पसार झाले होते. प्रत्यक्षदर्शीने सांगितले.  हातोडा पुलामुळे तळोदा ते नंदुरबार हे अंतर कमी झाल्याने साहजिकच विविध कामांसाठी नंदुरबारकडे जाणा:यांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी हातोडा रस्त्यावर वाहनांची वर्दळदेखील वाढली. मात्र गेल्या महिन्यात रस्ता लुटीच्या घटना सुद्धा वाढल्या आहेत.या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भिती पसरली आहे. निझर ते तळोदा पोलिसांनी गस्त घालण्याचा दावा केला असला तरी त्यानंतर लगेच रस्ता लुटीची घटना घडल्याने एक प्रकारे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. दरम्यान या प्रकरणी जिल्हा पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन या ठिकाणी कायमची पोलीस चौकी उभारण्यात यावी, अशी वाहनचालकांची मागणी आहे