लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दोन दिवसांवर ईद येऊन ठेपली असून ईदचा चंद्र पाहण्यासाठी मुस्लीम समाजातील सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. यंदा कोरोनाने अनेकांच्या चेहऱ्यावरील हास्यच हिणवले असल्याने हे हास्य फुलविण्यासाठी आॅल इंडिया मेमन जमात फेडरेशनतर्फे ईदच्या खरेदीतील रक्कम वाचवून जिल्ह्यातील सुमारे ५०० कुटुंबांच्या चेहºयावर हास्य फुलवले आहे.ईद हा मुस्लीम समाजातील वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण. वर्षातून एकदा येणाºया या सणानिमित्त संपूर्ण रमजान महिन्यात जवळपास सर्वच मुस्लीम बांधव उपवास करतात. त्यानिमित्ताने इफ्तार पार्टी होतात. नवीन कपडे व इतर साहित्याची खरेदी केली जाते. यावर्षी मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने रमजान महिन्यातील उत्साह काहीसा हरवला आहे. संपूर्ण जगातच मानव जातीवरील हे संकट असल्याने हे संकट दूर व्हावे यासाठी अनेक ठिकाणी प्रार्थना केली जात आहे.आॅल इंडिया मेमन जमात फेडरेशनच्या नंदुरबार जिल्हा संघटनेतर्फे त्यानिमित्ताने एक वेगळा उपक्रम राबविण्यात आला. मेमन जमातीचे जिल्ह्यात सुमारे ७५० कुटुंब आहेत. त्यांनी यावर्षी ईदच्या खरेदीची रक्कम व इफ्तार पार्टीवरील रक्कम निराधार व गरीब कुटुंबांच्या मदतीसाठी एकत्र करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार समाजातील बहुतांश कुटुंबांनी निधी दिला. या निधीतून जिल्ह्यातील जवळपास ५०० पेक्षा अधिक कुटुंबांना संसारोपयोगी साहित्य, जीवनावश्यक वस्तू वाटप करून गरीब कुटुंबांच्या चेहºयावर हास्य फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर स्थलांतरित मजुरांसाठी फुड पॉकेटसह ज्या मजुरांच्या पायात चप्पल नसेल अशा मजुरांना चप्पल वाटप करण्यात आले. याशिवाय मजुरांना आवश्यक त्या वस्तूही देण्यात आल्या. एकूणच मेमन जमातीने या उपक्रमातून राष्टÑीय एकात्मता जोपासण्याचा प्रयत्न केला.
यावर्षी कोरोनाचे संकट मानव जातीवर आले आहे. अशा स्थितीत ईदच्या वैयक्तिक कुटुंबासाठी आनंद घेण्यापेक्षा तो समाजात वाटावा या हेतूने मेमन जमात फेडरेशनने हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. त्याला आॅल इंडिया फेडरेशनचे अध्यक्ष इकबाल आॅफिसर व युवा अध्यक्ष इम्रान फ्रुटवाला यांनाही तो उपक्रम चांगला वाटल्याने त्यांनी त्याचे स्वागत करून देशातील विविध भागातही तो राबविण्याचे आवाहन केले होते. यामुळे यंदाची ईद अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निश्चितच आनंद राहणार आहे.-शब्बीर मेमन, अध्यक्ष, मेमन जमात फेडरेशन, उत्तर महाराष्टÑ.