शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर तालुक्यात पावसाचा हाहाकार, एकजण वाहून गेल्याची भिती, अनेक जणावरे दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूर व धडगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. नवापूर तालुक्यातील सरपणी नदीचे पाणी घरांमध्ये घुसल्याने विसरवाडी येथे 25 पेक्षा अधीक जनावरे वाहून गेली तर एका महिलेचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त होत आहे. नवापूरातील एक फरशीपूल वाहून गेला. धुळे-सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटात दरड कोसळल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूर व धडगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. नवापूर तालुक्यातील सरपणी नदीचे पाणी घरांमध्ये घुसल्याने विसरवाडी येथे 25 पेक्षा अधीक जनावरे वाहून गेली तर एका महिलेचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त होत आहे. नवापूरातील एक फरशीपूल वाहून गेला. धुळे-सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 11 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे नवापूर व धडगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. नवापूर तालुक्यात 140 तर धडगाव तालुक्यात 104 मि.मी.पाऊस नोंदला गेला. नवापूर व गुजरातमधील डांग जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे रंगावली, सरपणी नद्यांना पूर आला. यामुळे विसरवाडी येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलविले. या पुरात बालाहाट येथील एक महिला वाहून गेल्याची भिती आहे तर विसरवाडी व परिसरात 25 पेक्षा अधीक पाळीव जनावरे दगावली आहे. नवापुरातील पूल पाण्याखाली गेला आहे.धुळे-सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. चरणमाळ व नंदुरबारमार्गे ही वाहतूक वळविण्यात आली आहे. धडगाव तालुक्यात देखील अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याची माहिती आहे.नवापूर येथे रंगावली नदीला मोठा पुर आल्याने  पुरामध्ये 2 व्यक्ती अडकलेल्या होत्या त्यांना प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले.   काही सखल भागामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेल्याने नुकसान झाले आहे.  सर्व नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनाम्याचे काम तातडीने सुरु करण्यात आले आहे.जिल्हाधिका:यांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगावली नदीला आलेल्या पुरामुळे तसेच कोंडाईबारी घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतुक विस्कळीत झाली असून वाहतुक सुरळीत करण्याबाबत प्रशासनाकडून प्रय} सुरु आहेत.  जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यकारी अभियंता बांधकाम, जलसंपदा, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपायुक्त पशुसंवर्धन व इतर सर्व संबंधितांना तातडीने समस्या सोडविण्याबाबत निर्देशित केले आहे.  या संपूर्ण घटनेवर स्वत: जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी लक्ष ठेवून आहेत.